अक्षय कुमारच्या ‘OMG 2’ मध्ये काम करण्यास परेश रावल यांनी दिला नकार, म्हणाले; पहिल्या चित्रपटात मी अक्षयपेक्षा…

अक्षय कुमारच्या ‘OMG 2’ मध्ये काम करण्यास परेश रावल यांनी दिला नकार, म्हणाले; पहिल्या चित्रपटात मी अक्षयपेक्षा…

अक्षय कुमार आणि परेश रावल या जोडीने, बॉलीवूडला अनेक सुपरहिट सिनेमा दिले आहेत. या जोडीचे नाव घेतले की, बाबुराव आणि राजुची आणि पैसे मिळवण्यासाठी, सुरु असलेल्या धडपडीचा आठवण येते. त्यातून झालेल्या भन्नाट कॉमेडीचा आजही अनेकजण, हेरा-फेरी सिनेमाच्या रूपात आनंद घेतात.

केवळ हेरा-फेरीच नाहीय तर, अनेक सुपरहिट कॉमेडी आणि ड्रामा सिनेमामध्ये त्या जोडीने काम केले आहे. सिनेमा हिट करण्याचा एक, फॉर्मुला म्हणून या जोडीकडे, अनेक दिग्दर्शक आणि निर्माते बघतात. या दोघांची कॉमेडीची परफेक्ट टायमिंग आणि सोबत असलेली केमिस्ट्री यामुळे कोणत्याही सिनेमामध्ये अक्षय आणि परेश कमाल करतातच.

तर, अक्षय कुमारने यामध्ये भगवान श्रीकृष्णची भूमिका साकारली होती. या सिनेमाचे लोकप्रियता इतकी जास्त वाढली होती की, साऊथमध्ये तेलगू आणि कन्नड अशा दोन भाषेमध्ये हा सिनेमा परत बनवला गेला. तेलगू भाषेमध्ये पवन कल्याण आणि वेंकटेश यादोघांनी गोपाळा गोपाळा नावाने तर, कन्नडमध्ये उपेंद्र आणि सुदीप यादोघांनी मुकुंदा मुकुंदा नावाने या सिनेमाचे रिमेक केलं होत.

माघील बऱ्याच दिवसांपासून या सिनेमाचा सिक्वल येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, यामध्ये परेश रावल काम करणार की नाही यावर मोठा प्रश्न होता. मेकर्स आणि त्यांच्यामध्ये, सिनेमाच्या फीज वरून वा’द सुरु असल्याच्या चर्चाना उधाण आले होते. त्यातच आता, मेकर्सने पंकज त्रिपाठी याना परेश यांच्या भूमिकेसाठी निवडले आहे.

याबद्दल स्पष्टीकरण देत असताना मेकर्स म्हणतात की, आमची देखील पहिली पसंती, सहाजिकच परेश रावलच होते, मात्र त्यांनी मागितलेली फीज आम्ही त्यांना नाही देऊ शकत. त्यामुळे, सिनेमाच्या बाकी बजटवर परिणाम होत आहे. त्यामुळे यावर इतर कोणताही तोडगा निघत नाहीये. म्हणून आम्ही, त्यांच्याजागी पंकज त्रिपाठी यांची निवड केली.

परेश रावल यांनी, त्यांच्या फी च्या जागी इतर काही उपाय देखील मेकर्सला दिले होते मात्र, त्यापैकी कोणताच उपाय त्यांना मान्य नव्हता. अखेरीस, आता परेश रावल यांच्या जागी पंकज त्रिपाठी या सिनेमामध्ये काम करणार आहेत. मात्र, पडद्यावर जी जादू, अक्षय-परेशच्या जोडीने उमटवली होती, तीच जादू पंकज आणि अक्षय पुन्हा उमटवण्यात यशस्वी होतील का, जे सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच समजेल.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *