आईच्या गावात ! ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होण्यासाठी ‘या’ सेलिब्रिटी’ कपल’ला निर्मात्यांनी दिली कोट्यावधींची ऑफर !

आईच्या गावात ! ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होण्यासाठी ‘या’ सेलिब्रिटी’ कपल’ला निर्मात्यांनी दिली कोट्यावधींची ऑफर !

नुकतच बिग बॉस ओटीटी ची सांगता झाली आहे. प्रथमच बिग बॉस हा शो वेब सिरीज च्या रूपात दाखवण्याचा मेकर्सने प्रयत्न केला होता. त्याला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही दिवसांच्या या बिग बॉस ओटिटी पर्वाची दिव्या अग्रवाल विजेती ठरली. आता त्यानंतर बिग बॉस पंधराचे सगळीकडे वेध लागले आहेत.

नुकताच बिग बॉस मराठीचा तिसरा पर्व सुरु झाला आहे. त्यामुळे मराठी प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. अनेक वेगवेगळे कलाकार बिग बॉस मराठीमध्ये यावर्षी हजर आहेत. त्यापैकी काहींना चांगला प्रतिसाद मिळत आहे तर, काहींना ट्रोल देखील केले जात आहे. त्यातच आता बिग बॉस 15 ची चर्चा मात्र सगळीकडेच रंगलेली बघायला मिळत आहे.

2 ऑक्टोबर पासून बिग बॉस 15 हा रियालिटी शो पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येत आहे. यावर्षीदेखील सलमान खानच हा शो होस्ट करणार असून, त्याने मला मोठा चेक घेतला असल्याची बातमी देखील समोर आली आहे. बिग बॉस या शोची प्रीमियर डेट सांगितली की, तसे कोणकोणते कलाकार या शोमध्ये हजेरी लावू शकतात याबद्दल शक्यता वर्तवण्यात सुरुवात होते.

या मधील काहींचा अंदाज खरा ठरतो तर, काहींचे अंदाज अगदी चुकीचे ठरतात. मात्र सूत्रानुसार समोर आलेल्या माहितीनुसार, यावर्षी मेकर्सने एका सेलिब्रिटी कपलला तब्बल चार कोटीची ऑफर दिली आहे. चार कोटी म्हणजे शोच्या विजेत्याच्या किमती पेक्षाही चार पट जास्त किंमत. तसे बघता या सेलिब्रिटी कपलची लोकप्रियता चांगलीच आहे.

त्यामुळे त्यांना बिग बॉसच्या घरात बघणे चाहत्यांसाठी चांगलेच रंजक ठरू शकते. स्टार प्लस या वाहिनीवरील लोकप्रिय शो ये रिश्ता क्या कहलाता है लवकरच ऑफ एअर होणार आहे. त्यामधील मुख्य कलाकार ‘शिवांगी जोशी व मोहसिन खान’ यांची जोडी सर्वांनाच खूप जास्त आवडली होती.

हा शो संपण्यापूर्वीच बिग बॉस ने या दोघांना मोठी ऑफर देऊन आपल्या शोमध्ये घेऊन येण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या दोघांचा आहे चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्यामुळे बिग बॉस सारख्या शोमध्ये त्यांची हजेरी नक्कीच शोच्या फायद्याची ठरेल हे मेकर्सला माहित आहे. यापूर्वीदेखील ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतील अनेक कलाकारांनी बिग बॉस या शोमध्ये हजेरी लावली होती.

त्यापैकी करण मेहरा आणि रोहन मेहरा हे दोघेही एकाच सीजनमध्ये आले होते. त्यावेळी देखील त्यांची लोकप्रियता चांगलीच वाढली होती. या दोघांना नंतर पुढच्या सीजन मध्ये हिना खान हिने हजेरी लावली होती. त्या पर्वाची हिना खान सर्वात महागडी कलाकार होती, असे देखील सांगितले जाते. मात्र बिग बॉस मध्ये हिना खानने चांगलीच लोकप्रियता कमावली होती.

हिना खानच्या लोकप्रियतेचा फायदा त्या पर्वात नक्कीच झाला होता. त्यामुळे आता पुन्हा ये रिश्ता क्या केहलाता हे मधील मुख्य कलाकारांना या शोमध्ये घेण्याचे मेकर्स प्रयत्न करत आहेत. अद्याप शिवांगी जोशी किंवा मोहसिन यांच्या दोघांपैकी कोणीही याबद्दल कोणतेही अधिकृत विधान दिलेले नाही. मात्र इतकी मोठी रक्कम असल्यावरही, या शोमध्ये जाण्यास नकार देणे केवळ मूर्खपणा ठरेल, असे काही नेटकरी बोलत आहे. तेव्हा आता हे दोघे बिग बॉस मध्ये सोबत येतात की नाही याचा खुलासा 2 ऑक्टोबरला होईल.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *