आथिया-KL राहुलच्या नात्याबाबत सुनील शेट्टीने केला खुलासा, म्हणाला त्यांना दोघांना एकत्र पाहिलं की…

आथिया-KL राहुलच्या नात्याबाबत सुनील शेट्टीने केला खुलासा, म्हणाला त्यांना दोघांना एकत्र पाहिलं की…

बॉलीवूडमध्ये अभिनेता सुनील शेट्टी यांचा चांगला दबदबा आहे. सुनील शेट्टी यांनी त्या काळामध्ये अनेक चित्रपटात काम केले. यामध्ये सपूत हा चित्रपट त्यांचा प्रचंड चालला होता. त्यानंतर बलवान हा चित्रपट त्यांनी पदार्पणातच हिट केला होता. याच बरोबर त्यांचा गोपीकिशन नावाचा चित्रपट देखील प्रचंड गाजला होता.

गोपीकिशन मध्ये त्यांची हवालदारची भूमिका सगळ्यांनाच आवडली होती. त्यांचा इसवी 2000 मध्ये आलेला धडकन हा चित्रपट देखील प्रचंड चालला होता. या चित्रपटातील गाणी सगळी चांगली गाजली होती. यातील तुम दिल की धडकन मे रहते हो’ हे गीत खूप गाजले होते. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटात काम केले. मात्र, एका टप्प्यावर त्यांनी खूप चुका केल्या.

काही दिवसापूर्वी अथिया शेट्टी ही क्रिकेटर के. एल. राहुल यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर झाला आहे. या फोटोमध्ये दोघेही अतिशय मादक असे दिसत आहेत. सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघ लंडन मध्ये आहे. लंडनमध्ये जाताना प्रत्येक क्रिकेटरला आपल्या सोबत कोण आहे, याची माहिती द्यावी लागते.

या वेळी राहुल याने आपल्या पार्टनर लिस्टमध्ये अथिया हिचे नाव लिहिल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सुनील शेट्टी यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर सुनील शेट्टी म्हणाले की, अथिया आणि तिचा लहान भाऊ अहान सध्या लंडनमध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले आहेत.अथिया आणि राहुल यांची जोडी ही चांगली दिसते. ते अतिशय सुंदर दिसतात.

मात्र, केवळ जाहिराती मध्ये, असे त्यांनी मिश्कीलपणे म्हटले आहे. त्यावर एकाने त्यांना प्रश्न विचारला की, ते दोघं रिलेशनमध्ये आहेत का? यावर सुनील शेट्टी म्हणाले की, याबाबत मी कसे काय सांगू शकतो. याबाबत तुम्ही त्यांनाच माहिती विचारा. त्यामुळे आता अथिया आणि राहुल लग्न करतात का? त्यांच्या नात्याबद्दल माहिती देतात का? हे पाहावे लागेल.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *