आयपीएल निवृत्तीबाबत धोनीची घोषणा! भावुक होऊन म्हणाला; CSK चा शेवटचा सामना माझा…

आयपीएल निवृत्तीबाबत धोनीची घोषणा! भावुक होऊन म्हणाला; CSK चा शेवटचा सामना माझा…

एम एस धोनी म्हणलं की, सर्व भारतीयांना आठवतो तो, २०११चा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मारलेला ऐतिहासिक सिक्स. आपल्या देशात, कोटींच्या संख्येने क्रिकेटप्रेमी आहेत. १९८३ नंतर, भारताने एक देखील वर्ल्ड-कप जिंकला नव्हता. अनेक खेळाडूंनी वर्ल्डकप जिंकून देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यामध्ये केवळ एम एस धोनीलाच यश आले.

इतरांच्या तुलनेत धोनीची कारकीर्द थोडी उशिराच सुरु झाली. मात्र तरीही आपल्या, कारकिर्दीमध्ये त्याने अनेक ऐतिहासिक विक्रमांवर स्वतःचे नाव कोरले आहे. त्यामुळेच धोनी अनेकांचा सर्वात आवडता खेळाडू आहे. आजवर जगभरातील सर्वात उत्तम खेळाडूंपैकी एक म्हणून धोनीचे नाव घेतले जाते. १५ ऑगस्ट २०१९ रोजी धोनीने, भारतीय संघातून आणि आंतरराष्ट्रीय खेळातून निवृत्ती जाहीर केली.

त्यावेळी अनेकांना, खास करून त्याच्या चाहत्यांना खूप दुःख झाले. मात्र तरीही, कमीत कमी आयपीएल मध्ये तरी धोनी खेळत आहे याच त्याच्या चाहत्यांना समाधान होते. तसे बघता, चेन्नई सुपरकिंग्स आणि एम एस धोनीचे खूप वेगळे आणि खास नाते आहे. धोनी आणि चेन्नई सुपर किंग्स हे आयपीएल सुरु झाल्यापासूनच सोबत आहे.

त्यामुळे, चेन्नईचा संघ धोनीशिवाय, असा विचारच करू शकत नाही. सध्या आयपीएलचे सामने, दुबईमध्ये सुरु झाले आहेत. आयपीएल २०२१च्या, प्ले-ऑफमध्ये पोहोचणारा चेन्नईचा पाहिलाच संघ ठरला. मागच्या वर्षी मात्र, चेन्नईच्या संघाला प्लेऑफमध्ये देखील जागा मिळवता आली नव्हती. त्यामुळे, धोनी आता आयपीएल मधून पण, निवृत्ती घेणार का, या चर्चाना उधाण आलं होत.

याबद्दल आता, स्वतः एम एस धोनीने खुलासा केला आहे. इंडिया सिमेंट्सला 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे, धोनीने चाहत्यांशी संवाद साधला. तेव्हा त्याने आपल्या निवृत्तीवर भाष्य केलं. ‘जेव्हा अलविदा करायची वेळ येईल, तेव्हा नक्कीच तुम्ही येऊ शकता. आणि मला सीएसकेकडून खेळताना बघू शकाल. तुम्हाला मला अलविदा करण्याची संधी मिळेल.

आम्ही चेन्नईमध्येच येऊन अखेरची मॅच खेळू, अशी अपेक्षा आम्हाला आहे. सगळ्या चाहत्यांनाही भेटू. आमच्या चेन्नईच्या फॅन्सच्या चियरिंगच्या आवाजात, खेळ खेळायला आम्हाला आवडेल. त्यांच्याशिवाय मी माझा अखेरचा खेळ कस खेळू?’ असं अत्यंत भावुक वक्तव्य धोनीने केलं. त्याच्या या, विधानावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया, नेटिझन्स देत आहेत.

२०१९ नंतर, धोनी चेन्नईकडून खेळूच नाही शकला. यंदाच्या वर्षीचे, २९ सामने भारतात खेळता आले. मात्र काही खेळाडूंना, को’रो’नाची ला’गण झाल्यामुळे सामने मध्यात थांबवण्यात आले. आणि आता, उर्वरित सामने दुबईमध्ये खेळले जात आहेत. यामध्ये, चेन्नई सुपरकिंग्सचा सगळीकडेच बोलबाला आहे. एमएस धोनीने त्याच्या, कॅप्टन्सीमध्ये चेन्नई सुपर किंग्सला 5 टी-20 ट्रॉफी जिंकवून दिल्या आहेत.

यामध्ये 3 आयपीएल ट्रॉफी तर, 2 चॅम्पियन्स लीग ट्रॉफीचा समावेश आहे. 2018 नंतर चेन्नई सुपर किंग्सला, एकसुद्धा ट्रॉफी जिंकता आलेली नाही, त्यामुळे यावेळी धोनी पुन्हा एकदा फायनल जिंकण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे. आयपीएलनंतर, एम एस धोनी टी-20 वर्ल्ड कपकरिता टीम इंडियाचा मेंटर म्हणून काम करणार आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *