बिहारच्या ‘या’ शाळेत शिकत आहे इम्रान हाश्मी आणि सनी लिओनीचा मुलगा..! काय आहे प्रकार जाणून घ्या…

बिहारच्या ‘या’ शाळेत शिकत आहे इम्रान हाश्मी आणि सनी लिओनीचा मुलगा..! काय आहे प्रकार जाणून घ्या…

अभिनेत्री सनी लिओनी आणि अभिनेता इमरान हाश्मी हे बिहारमध्ये राहतात आणि त्यांना 20 वर्षांचा मुलगा देखील आहे. ऐकून आपल्याला ध-क्का बसला ना. असं तुम्हाला कोणी सांगितले तर तुम्ही नक्कीच त्या व्यक्तीला वेड्यात काढाल. पण खरोखरच असा दावा करणारे कॉलेजचे आयडी कार्ड मिळाले आहे.

बिहारच्या मुज्जफरापूरमधील एका कॉलेजमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. येथील भीमराव आंबेडकर बिहार विद्यापिठातील अधिकाऱ्यांनी जेव्हा बीएच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या आयडी कार्डचे फोटो पाहिले तेव्हा तेही गोंधळले.

कुंदर कुमार असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो धनराज महतो डिग्री कॉलेजचा विद्यार्थी आहे. हे कॉलेज मुज्जफरापूरमधील मिनापूर येथे असून ते भीमराव आंबेडकर विद्यापीठाशी संलग्न आहे. तर त्याच्याजवळ कोणते आयडी कार्ड सापडले त्याबद्दल जाणून घेवू.

कुंदर कुमारच्या कॉलेजच्या आयडी कार्डवर वडिलांचे नाव इमरान हाश्मी असल्याचे लिहिले आहे. तर आईच्या नावाच्या जागी सनी लिओनी असे लिहले आहे. पण या मुलाच्या पालकांची ही नावे असू शकत नाही असे येथील अधिकाऱ्यांचं मत आहे. जरी असली तरी हा योगायोग असावा असे म्हणता येईल.

मात्र एकाच घरातील तीन व्यक्तींची तीन वेगळी अडनावे कशी असू शकतील अशी चर्चाही या आयकार्डवरुन होवू लागलीये. त्यामुळे हे आयकार्ड म्हणजे एखाद्याने केलेली मस्करी असावी किंवा बेजबाबदारपणामुळे घडलेला प्रकार असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

आता त्यात आणखी कहर म्हणजे या आयडी कार्ड वरील घराचा पत्ता म्हणून ज्या चतुर्भुज स्थान परिसराचे नाव लिहिलं आहे तो परिसर रेड लाइट एरिया म्हणून प्रसिद्ध आहे. या अजब आयकार्ड प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. एखाद्याने केलेली मस्करी असू शकते, कदाचित त्यामध्ये या विद्यार्थ्याचा सहभाग देखील असू शकतो.

पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने चौ-कशी करण्याचे आदेश दिले आहेत. ही एखाद्याने केलेली मस्करी असू शकते ज्यामध्ये विद्यार्थ्यांचाही समावेश असू शकतो. या प्रकरणाची चौ-कशी केल्यानंतर सादर करण्यात येणाऱ्या अहवालाच्या आधारे दो-षींवर कठोर का-रवाई करण्यात येईल अशी माहिती विद्यापिठाचे कुलसचिव राम कृष्ण ठाकूर यांनी दिली आहे.

इम्रान हाश्मीने दिली यावर प्रतिक्रिया:- या आयडी कार्डचे फोटो सो’शल मी’डि’यावर व्हा’यलर झाले आहेत. काही वेबसाईटवर बातम्याही आल्या आहेत. अशाच एका बातमीवर अभिनेता इमरान हाश्मीने मजेदार प्रतिक्रिया दिली आहे.

ही बातमी समोर आल्यानंतर आता इम्रान हाश्मीनं यावर प्रतिक्रिया दिली आहे. हीच बातमी रिट्विट करत त्यानं लिहिलं की, शपथ घेऊन सांगतो हा माझा मुलगा नाहीये. इम्रान हाश्मीचं हे फनी ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक लोक यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील देत आहेत.

याप्रकरणाशी सं-बंधित सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता आधारकार्ड, मोबाईल क्रमांक आणि ओळखपत्रावरील इतर माहितीच्या आधारे या विद्यार्थ्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. लवकर सत्य समोर येईल.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *