ऋषी कपूर यांच्या संपत्तीचा आकडा वाचून व्हाल थक्क! रणबीर साठी सोडले एवढे !

ऋषी कपूर यांच्या संपत्तीचा आकडा वाचून व्हाल थक्क! रणबीर साठी सोडले एवढे !

बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेता म्हणून ऋषी कपूर यांच्याकडे पाहिलं जायचं. केवळ बॉलिवूडचं नाही तर त्यांचं घरातील वागणंही अगदी तसंच बिनधास्त आणि खेळीमेळीचं होतं. सतत चाहत्यांच्या संर्पकात राहणाऱ्या या कलावंताने ३० एप्रिल रोजी जगाचा निरोप घेतला.

मात्र त्यांच्या आठवणी आजही जीवंत आहेत. एक उत्तम कलाकार असण्यासोबतच चांगला मुलगा, पती, वडील अशा जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या ऋषी यांनी निधनानंतरही त्यांच्या कुटुंबाची साथ सोडली नाही. त्यांनी कुटुंबासाठी मोठ्या संपत्तीची तजवीज करुन ठेवली आहे. त्यामुळे सध्या ऋषी कपूर यांच्या संपत्तीविषयी चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

ऋषी कपूर यांचं वार्षिक उत्तन जवळपास २० कोटी ते ३.७ मिलिअन डॉलर इतकं असल्याचं म्हटलं जातं. तसंच त्यांच्याकडे अनेक लक्झरी गाड्या असून त्यांची किंमत जवळपास ९.७ मिलिअन डॉलरच्या घरात असल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे त्यांच्या एकूण संपत्तीचा विचार केला, तर जवळपास ४० मिलिअन डॉलर आहे.

दरम्यान, मेरा नाम जोकर, बॉबी या चित्रपटांच्या माध्यमातून ते खऱ्या अर्थाने नावारुपाला आले. आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास १२३ चित्रपटांमध्ये काम केलं. उत्तम अभिनयाच्या जोरावर अनेक पुरस्कार स्वत:च्या नावावर करणाऱ्या या अभिनेत्याने ‘द बॉडी’ या चित्रपटात अखेरचं काम केलं होतं. हा चित्रपट १३ डिसेंबर २०१९ ला प्रदर्शित झाला होता.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *