एक-दोन नव्हे तर चार वेळा पडले होते प्रेमात, तरीही ‘या’ कारणामुळे अविवाहित आहेत रतन टाटा….

एक-दोन नव्हे तर चार वेळा पडले होते प्रेमात, तरीही ‘या’ कारणामुळे अविवाहित आहेत रतन टाटा….

देशातील यशस्वी उद्योजकांच्या यादीत श्री रतन टाटा यांचं नाव घेतलं जातं. रतन टाटा ‘बस्स नाम ही काफी है’, असं म्हटलं तर काहीच चुकीचं ठरणार नाही. कारण ते एक यशस्वी उद्योजक आहेत. हे पाहता सर्वांना त्यांचा अभिमान वाटणे सहाजिक आहे.

सोशल मिडिया म्हणू नका, किंवा उद्योग क्षेत्रातील प्रगती होण्याच्या दृष्टीने काम करणारे असंख्य लोक आहेत, पण त्यात रतन टाटा हे एक नाव आहे. अविवाहीत रतन टाटांनी एक मुलाखतीत स्वतः आपल्या प्रेमाविषयी मनमोकळेपणाने सांगितली आहे, पण त्यांनी त्यांच्या जीवनात कोणावरच प्रेम केलं नाही, असं काही नाही.

परंतु २०११ साली CNN इंटरनॅशनल टॉक एशिया प्रोग्रमला दिलेल्या मुलाखतीत मात्र त्यांनी याबद्दल थोडंफार सांगितलं. त्यात ते म्हणाले की, माझं चार वेळा लग्न होता होता राहिलं. प्रत्येक वेळेस काहीना काही वेगवेगळ्या घडामोडी घ’डत राहिल्या, एकातून दुसरी घटना, दुसरीतून तिसरी आणि मग लग्न करायचं राहूनच गेलं. या चारही वेळांमध्ये वेगवेगळे प्रसंग घडले आणि लग्न राहून गेलं.

परंतु आता मात्र आता मात्र मी या घटनांकडे जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा त्यावेळेस यामध्ये सहभागी असलेल्या व्यक्ती आणि सध्याची परिस्थिती पाहिली तर मात्र लग्न झालं नाही याची मला खंत वाटत नाही. कदाचित माझं लग्न झालं असतं तर कॉम्प्लिकेशन्स वाढले असते. त्यामुळे माझ्या हातून काही वा’ईट झालं नाही यात मी समाधानी आहे.

अलीकडेच रतन टाटांनी त्यांच्या तरुणपणाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. तो देखणा फोटो पाहिलं तर असं वाटतं की, यांच्या आयुष्यात प्रेमाच्या घ’टना घडल्याच नसतील का, हे कसं शक्य आहे आणि हाच प्रश्न जेव्हा त्यांना विचारण्यात आला त्यावेळेस ते म्हणाले की त्यांनी त्यांच्या आयुष्यातील पहिल्या प्रेमाबद्दल ही सांगितलं, जेव्हा ते अमेरिकेत होते तेव्हा त्यांचं एका मुलीवर प्रेम होतं. लग्नही होणार होतं. तो काळ १९६२ सालचा.

त्यावेळेस भारतात त्यांच्या आजीची तब्येत खालावली होती, म्हणून रतन टाटा भारतात परत आले. कारण रतन टाटांच्या आईवडिलांच्या विभक्तिनंतर आजीनेच त्यांचा सांभाळ केला होता. नेमकं त्याच वेळेस भारत- चीन यु’द्धाचा भ’डका उ’डाला होता. त्यावेळची परिस्थिती थोडी गं’भीर बनली होती आणि अमेरिकेच्या मते भारत-चीन यु’द्ध म्हणजे हिमालयात वाढलेला त’णाव होता.

परिस्थिती अस्थिर होती, यातून पुढे काहीही घडू शकतं अशी त्यांची शंका होती. भारत-चीन यु’द्धाच्या बातम्या मोठ्या प्रमाणात नकारात्मक होत्या. अशा अस्थिर वातावरणात तिला भारतात पाठवायला तिचे आईवडील तयार झाले नाहीत. आणि बहुतेक तिलाही भारतात येणं श्रेयस्कर वाटलं नसावं. म्हणूनच ती भारतात आली नाही आणि लग्न झालं नाही. मग पुढे तिने अमेरिकेतच लग्न केलं.

रतन टाटांना जेव्हा विचारण्यात आलं की, तुम्ही ज्यांच्यावर प्रेम केलं त्यापैकी कोणी अजूनही या शहरात राहते का? तर त्यावर त्यांनी होकारार्थी उत्तर दिलं. पण त्याविषयी जास्त बोलण्यास त्यांनी नकार दिला. कुठल्याही स्त्रीचं नाव त्यांनी याठिकाणी घेतलं नाही.

आपणास सांगू इच्छितो कि १९६२ नंतर त्यांनी टाटा समूहामध्ये काम करायला सुरुवात केली. १९९० मध्ये ते टाटा ग्रुपचे अध्यक्ष बनले, २०१२ पर्यंत त्यांनी त्याचा कार्यभार पाहिला. टाटा ग्रुपच्या नियमानुसार वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी टाटा ग्रुपच्या अध्यक्ष पदाचा पदभार सोडला.

त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत जग्वार, लँड रोवर, टेटली आणि कोरस अशा परदेशी कंपन्या टाटा ग्रुप मध्ये सामील केल्या. २००८ मध्ये जेव्हा ता’जवर अ’ति’रे’की ह’ल्ला झाला, त्यात घा’याळ झालेल्या, मृ’त्युमु’खी प’डलेल्या सर्व ताज कर्मचाऱ्यांना, रतन टाटांनी सढळ हाताने मदत केली.

त्यानंतर पा’किस्ता’न बरोबर कोणताही व्यवहार करायचा नाही असा निर्णय टाटा ग्रुप ने घेतला. टाटा मेमोरियल ट्रस्ट तर्फे कित्येक कॅ’न्सर’ग्र’स्त रु’ग्णांचे उपचार मोफत किंवा कमी खर्चात होतात. रतन टाटांना २००० मध्ये पद्मभूषण आणि २००८ मध्ये पद्मविभूषण देऊन भारत सरकारने गौरवले आहे.

रतन टाटांनी लग्न केलं नाही किंवा संसार केला नाही, पण त्यांनी कितीतरी संसार उभे केले. पावसात भिजणाऱ्या २ व्हीलर वरील कुटुंबाला पाहून, अशा सर्वसाधारण माणसाला परवडेल अशा किमतीतील कार बाजारात आणली. आपलं साधे जीवन, साधी राहणी आणि संवेदनशीलता मात्र कायम जपली आणि एक आदर्शवत जीवन लोकांसमोर ठेवलं.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *