ऐश्वर्यासारखी दिसते म्हणून सलमाननं लॉन्च केलं…पण या ‘डुप्लिकेट’चं पुढे जे झालं ते वाचून चकित व्हाल..

ऐश्वर्यासारखी दिसते म्हणून सलमाननं लॉन्च केलं…पण या ‘डुप्लिकेट’चं पुढे जे झालं ते वाचून चकित व्हाल..

बॉलीवूडमध्ये कोणत्याही कलाकाराचे नाव झाले की सगळीकडेच त्याची चर्चा सुरु असते. मग नव्याने येणारे कलाकार कधी त्यांच्यासारखे दिसतात म्हणून त्यांना काम मिळते. मात्र जेव्हा एखादा कलाकार दुसऱ्या सुपरस्टार सारखा दिसत असतो, तेव्हा त्याला काम तर मिळते पण प्रमुख भूमिका शक्यतो मिळत नाही.

आपण बॉलीवूडमध्ये अनेक असे कलाकार पहिले आहेत, जे इतर मोठाल्या कलाकारांची शैली कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. अनेक वेळा त्या कलाकारांसारखे दिसण्याचा प्रयत्न करतात आणि मग तीच त्यांची ओळख बनून जाते. बॉलीवूडची द दिवा म्हणून ओळखली जाणारी ऐश्वर्या रायचे जगभरात लाखो चाहते आहेत. बॉलीवूडमध्ये पदार्पण कारण्यापूर्वीपासूनच तिच्या सौंदर्याची सगळीकडे चर्चा होती.

अनेक अभिनेत्रीने आणि मॉडेल्सने तिच्या सारख्या दिसतात किंवा तिची एक झलक त्यांच्यामध्ये आहे म्हणून काम मिळवले होते. मात्र त्यांना यश मिळालेच असे नाही. असेच काही झाले, ऐश्वर्याची डुप्लिकेट म्हणून बॉलीवूडमध्ये दमदार पदार्पण करणाऱ्या स्नेहा उल्लालच्या बाबतीत. स्नेहा ऐश्वर्याची दूरची बहीण वगैरे नाहीये, मात्र ती बऱ्याच अंशी तिच्यासारखी दिसते.

त्यामुळे, सलमान खानने तिला लकी-नो टाइम फॉर लव्ह या सिनेमातून बॉलीवूडमध्ये लाँच केले होते. सलमान खान सोबतच मिथुन चक्रवर्ती आणि इतर अनेक मोठाले कलाकार या सिनेमामध्ये होते.मात्र,तरीही या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल नाही केली. ऐश्वर्याच्या सुंदरेतपुढे स्नेहाची सुंदरता कमीच पडली, सोबतच अभिनयसुद्धा नाही जमला आणि म्हणून चाहत्यांनी तिला नाकारला.

त्यानंतर तिने काही सिनेमामधून काम केला, मात्र तिला यश मिळालं नाही. मग अचानक स्नेहा बॉलीवूडमधून गायब झाली. बॉलीवूडमध्ये काम मिळत नाही, म्हणून तिने आपला मोर्चा साऊथच्या सिनेमांकडे वळवला. ऐश्वर्याची झलक असणाऱ्या स्नेहाला, साऊथमध्ये मात्र चांगले काम मिळत गेले. साऊथमध्ये ऐश्वर्याची इतकी जास्त फॅन-फॉलोविंग आहे की, त्यांनी तिच्या सारख्या दिसणाऱ्या स्नेहाला देखील पसंती दिली.

साऊथमध्ये स्नेहाचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. अनेक सिनेमामध्ये तिने काम केलं आहे. काही सिनेमामध्ये तिने गेस्ट म्हणून देखील काम केलं आहे. अल्लू-अर्जुनच्या काही सिनेमामध्ये तिने त्याच्यासोबत काही गाणे केले आहेत. ते गाणे चांगलेच सुपरहिट ठरले. नागार्जुनच्या काही सिनेमामध्ये देखील तिने काम केलं आहे.

२०१० मध्ये स्नेहा उल्लालने बॉलीवूडमध्ये पुन्हा पदार्पण करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. मात्र त्यानंतर ती फारशी कुठेच दिसली नाही. ना साऊथ सिनेमामध्ये, ना बॉलीवूडमध्ये. २०१५ मध्ये तिने बेजुबां नावाचा हिंदी सिनेमा केला होता. मात्र या सिनेमाने देखील कोणतीही कमाल केली नाही. खरे त्यानंतर ती प्रचंड आ’जारी पडली होती.

र’क्तासंद’र्भातील एक आ’जार ऑ’टोइ’म्युन डि’सऑ’र्डर स्नेहा ला झाला होता. या आ’जराने तिला अत्यंत ग्रा’सले होते. त्यामुळे तिला उभं देखील राहता येत नव्हते. त्याबद्दलची तिची ट्री’टमेंट पूर्ण झाली आहे. आणि आता तिची तबि’यत देखील उत्तम आहे. त्यामुळे स्नेहा पुन्हा चित्रपटसृष्टीकडे वळली आहे.

सध्या स्नेहा झी५ च्या एक्सपायरी डेट या वेबसिरीज मध्ये काम करत आहे. बॉलीवूडमध्ये स्नेहाची जादू नाही चालली, मात्र साऊथमध्ये ती चांगलीच लोकप्रिय ठरली. साऊथमध्ये काम करत असताना, तिने आपली ओळख निर्माण केली. कधी काली केवळ ऐश्वर्याची डुप्लिकेट म्हणून ओळखली जाणारी स्नेहाला आता तिच्या नावाने ओळखले जाते.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *