ऑलिम्पिकमधील सामन्याआधी मेरी कोमसोबत घडला धक्कादायक प्रकार ! म्हणाली; मॅच सुरु होण्याच्या ५ मिनिटे आधी माझे कपडे…

ऑलिम्पिकमधील सामन्याआधी मेरी कोमसोबत घडला धक्कादायक प्रकार ! म्हणाली; मॅच सुरु होण्याच्या ५ मिनिटे आधी माझे कपडे…

२३ जुले पासून जपानच्या टोकियोमध्ये ऑलम्पिक सुरु आहे. यामध्ये अनेक खेळाडूंनी आता पर्यंत अनेक पदके जिंकले आहे. पण यावेळी देखील आपल्या देशाला एका गोल्ड साठी संघर्ष करावा लागत आहे. विशेष म्हणजे फक्त एक सिल्वर आपल्यला मिळाले आहे. १३५ कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशाला एका गोल्ड साठी संघर्ष करावा लागणे हे दुर्देव आहे.

दरम्यान, गेल्या ऑलम्पिक प्रमाणे यावर्षी प्रसिद्ध बॉक्सर मेरी कॉमला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. मेरी कोम हिचे टोकयो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. महिलांच्या 51 किलो गटाच्या उपउपांत्यपूर्व लढतीत तिला तृतीय मानांकित कोलंबियाच्या इंग्रीट व्हॅलेन्सिया हिच्याकडून धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले.

पराभवानंतर मेरी कोमने मॅच रेफरीच्या निर्णयांबाबत काही प्रश्नचिन्ह उभे केले होते. त्यानंतर आता तिने सामन्याआधी तिच्यासोबत घडलेला एक धक्कादायक प्रकार ट्विटरवर शेअर केला असून त्या ट्विटमध्ये तिने पंतप्रधान कार्यालय व क्रीडा मंत्र्य़ांना टॅग केले आहे.

मेरी कोम हिचा सामना सुरू होण्याच्या अवघ्या एक मिनिटं आधी तेथील आयोजकांनी तिला तिचे कपडे बदलायला लावले. त्या मागचे कारण मेरी कोमला दिले गेले नव्हते. मात्र आता मेरी कोमने ट्विटरवरून याबाबत पोस्ट करत त्याचे कारण विचारले आहे.

‘आश्चर्य आहे. कुणी मला हे समजावू शकेल का की रिंगमधला ड्रेस काय असू शकतो? मला माझ्या सामन्याच्या एक मिनिट आधी कपडे बदलायला लावले. हे असे का केले ते मला कुणी समजावू शकेल का? असा सवाल करत मेरी कोमने या ट्विटमध्ये पीएमओ कार्यालय, क्रिडा मंत्री अनुराग ठाकूर, किरेन रिजीजू, अधिकृत ऑलिम्पिक पेजला टॅग केले आहे.

या पराभवाबरोबरच मेरी कोमचा ऑलिम्पिकमधील प्रवासही संपुष्टात आला. होय, या 38 वर्षीय सुपर मॉम हिंदुस्थानी बॉक्सरचे हे शेवटचे ऑलिम्पिक होते. 2016च्या रियो ऑलिम्पिकमधील कास्य पदक विजेत्या मेरी कोमकडून देशवासीयांना यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाची अपेक्षा होती. कोलंबियाच्या इंग्रीट व्हॅलेन्सियाचा तिने आतापर्यंत झालेल्या दोन्ही लढतीत पराभव केलेला होता.

त्यामुळे मेरी कोमचे चाहते बिनधास्त होते. मात्र इंग्रीट व्हॅलेन्सियाने मेरी कोमचा 3-2 गुण फरकाने पराभव करीत खळबळ उडवून दिली. पहिल्या फेरीत मेरीला कोलंबियाच्या बॉक्सरकडून 1-4 असा पराभव पत्करावा लागला, तर दुसऱ्या फेरीत मेरी कोमने जोरदार पुनरागमन करत 3-2 असा विजय मिळविला. मात्र तिसऱ्या व निर्णायक फेरीत इंग्रीट व्हॅलेन्सियाने केवळ पुनरागमन केले नाही तर सामना 3-2ने जिंकला.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *