सांगली : ओढ्यात वाहून जाणाऱ्या तीन महिलांना ‘या’ जिगरबाज तरुणांनी वाचवले..व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद…

सांगली : ओढ्यात वाहून जाणाऱ्या तीन महिलांना ‘या’ जिगरबाज तरुणांनी वाचवले..व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद…

मानसून नुकताच केरळातून महाराष्ट्रामध्ये दाखल होत आहे. 48 तासांमध्ये मान्सूनला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. त्यानंतर निसर्ग हिरवा शालू पांघरनार आहे. यावर्षी 99 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज आयडीने व्यक्त केला आहे. त्यामुळे यंदाही पावसाळा चांगला होईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी देखील पावसाळा चांगला झाला होता.

त्यामुळे शेतकरी सुखावला होता. मात्र, महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पुराने थैमान घातले होते. पश्चिम महाराष्ट्रमध्ये जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे कोल्हापूर, सांगली येथे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे येथील लोकांना खूप अडचणींचा सामना करावा लागला होता. तसेच शेती देखील उद्ध्वस्त झाली होती आणि त्यांच्या घरात पाणी घुसले होते.

शासनाने सर्व मदत नागरिकांना केली होती. मात्र, सर्वांपर्यंत ही मदत पोहोचू शकली नाही. दरवर्षी पावसाळामध्ये अनेक अशा घटना घडत असतात की, अनेक जण ओढ्यामध्ये, नदीमध्ये वाहून जात असतात. काहीजण फोटो काढण्यासाठी ओढ्याच्या जवळपास उभे राहतात आणि पाण्याचा प्रवाह वाढला की ते वाहून जातात.

अशा अनेक घटना आपण दरवर्षी पाहत असतो. त्यामुळे पावसामध्ये बाहेर निघताना अतिशय सांभाळून जावे, असे येथील प्रशासनातर्फे सांगण्यात येते. मात्र, नागरिक याचे पालन करताना दिसत नाहीत. त्यामुळे मोठ्या दुर्घ टना घडत असतात. सांगली जिल्ह्यामध्ये देखील अशी नुकतीच एक घटना उघडकीस आलेली आहे.

मात्र, ही घटना परिस्थितीनुसार घड’लेली आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये घटना उघडकीस आली आहे. या बाबतचा व्हिडिओ व्हा’यरल झाला आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात पछापुर येथे सात महिला जात होत्या. या महिला शेतीच्या कामासाठी वळसंग येथे गेल्या होत्या. त्यानंतर त्या आपल्या घरी परतत होत्या. दुपारच्या वेळेस अचानक मोठा पाऊस झाला.

त्यामुळे या महिला पावसात अडकल्या. मात्र, काही वेळाने या महिला गावाकडे जाण्यासाठी निघाल्या. त्यावेळी ओढ्याला जोरदार पाणी आले होते आणि त्या तेथुनच जात होत्या. मात्र, या सातही महिला पाण्यामध्ये अडकल्या. यातील तीन महिला या अचानकपणे वाहून जाऊ लागल्या होत्या. त्यानंतर श्रीकांत नाटेकर, आशिष जाधव, मोहसीन याच्यासह मनोज देवकर यांनी मंगला बाबर आणि दुसऱ्या महिलेला आपल्या जीवाची बाजी लावून वाचवले.

त्यानंतर थोडे समोर गेल्यानंतर एका एका झाडाचा आधार घेऊन गुलशन शेख ही पंचवीस वर्षीय महिला जीवाच्या आकांताने ओरडत होती. तिचा आवाज ऐकून अनिल भोसले या तरुणाने या महिलेला आपली जीवाची बाजी लावून वाचवले. त्यानंतर या तिन्ही महिलांची सुखरूप सुटका करण्यात आली आणि त्यांना घरी पोहोचवण्यात आले. या तरुणांनी दाखवलेल्या शौर्याचे कौतुक पंचक्रोशी मध्ये होत आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *