कंगनाच्या ‘सीता’ चित्रपटात रणवीरची एन्ट्री; खिलजीनंतर आता साकारणार ‘ही’ महत्वाची भूमिका…

कंगनाच्या ‘सीता’ चित्रपटात रणवीरची एन्ट्री; खिलजीनंतर आता साकारणार ‘ही’ महत्वाची भूमिका…

अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर ‘सीता’ या चित्रपटाच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. करीना कपूरने या चित्रपटासाठी १२ कोटी रुपये मानधन माघीतले असल्याची चर्चा सोशल मीडियावर बरीच व्हायरल झाली होती. जास्त मानधन मागितल्यामुळे तिच्यावर नेटकाऱ्यानी टीका केल्या होत्या त्याचबरोबर काही संघटनांनी देखील तिच्या भूमिका करण्यावर आक्षेप घेलता होता.

त्या संघटनेचे असे म्हणणे होते की सीता मातेची भूमिका एका हिंदू अभिनेत्याचं साकारावी. दरम्यान, करीना कपूर नंतर दीपिका पदुकोणचे नाव या भूमिकेसाठी जोर धरत होते. पण शेवटी सीता मातेच्या भूमिकेसाठी कंगना रानौतची वर्णी लागली आहे. नुकताच चित्रपटाच्या टीमने याला दुजोरा दिला आहे.

फिल्मफेअरने दिलेल्या वृत्तानुसार द इनकारनेशन : सीता चित्रपटाचे निर्मात्यांनी रणवीरला लंकेश रावणाच्या भूमिकेसाठी विचारणा केली आहे. रणवीरला मे महिन्यातच ही ऑफर देण्यात आली होती. ज्यानंतर रणवीर आणि निर्मात्यांमध्ये चर्चा सुरू आहे. सध्यातरी रणवीर चित्रपटाच्या फायनल नरेशनच्या प्रतीक्षेत आहे. रिपोर्ट्स नुसार रणवीर या चित्रपटाच्या भूमिकेसाठी फारच उत्सुक आहे.

काही वृत्तानुसार सीता एक बिग बजेट चित्रपट असणार आहे. ज्याला बाहुबलीच्या भव्य दिव्य सेट्स प्रमाणे बनवलं जाणार आहे. चित्रपटातील डायलॉग आणि लिरिक्स मनोज मुंतशिर यांनी लिहिले आहेत. तर सलोनी शर्मा आणि अंशिता देसाई मिळून चित्रपटाची निर्मिती करत आहेत. सीता चित्रपटाशिवाय रणवीर सिंगकडे अनेक मोठ्या चित्रपटांच्या ऑफर आहेत. रणवीरने नुकतंच करण जौहरचा चित्रपट रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाचं शूटिंग देखील सुरू केली आहे. याशिवाय तो 83 या चित्रपटात देखील दिसणार आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी या रोलसाठी अभिनेत्री करीना कपूर आणि दीपिका पादूकोन यांच्या नावांची जोरदार चर्चा होती. मात्र आता कंगनाची वर्णी या रोलसाठी लागली आहे. चित्रपटाचे लेखक मनोज मुंटाशीर यांनी सांगितलं की या भूमिकेसाठी दीपिका किंवा करीनाला विचारण्यात आलं नव्हतं.

करीनाला या रोलसाठी विचारण्यात आलं होतं अशी बातमी समोर आली होती. तसेच तिने या रोलसाठी 12 कोटी रुपयांची मागणी केली होती. अशीही माहिती समोर आली होती. त्यानंतर करीनाला ट्रो’ल करण्यात आलं होतं. तसेच दीपिकाला देखील चित्रपटासाठी विचारण्यात आलं होतं अशी अ’फवा होती, मात्र मनोज यांनी या सगळ्या अ’फवा असल्याचं म्हटलं आहे. फ्री प्रेस जर्नलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली तसेच या रोलसाठी कोणी यंग अभिनेत्रीचा शोध घेत होतो असंही त्यांनी सांगितलं.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.