कधीकाळी अभिनयात गोविंदालाही टक्कर देणाऱ्या ‘या’ अभिनेत्याला काम मिळणेही झाले कठिण, बिकट परिस्थितीमुळे…

कधीकाळी अभिनयात गोविंदालाही टक्कर देणाऱ्या ‘या’ अभिनेत्याला काम मिळणेही झाले कठिण, बिकट परिस्थितीमुळे…

बॉलीवूडमध्ये रोज नवीन कलाकार पदार्पण करतात. काही आपल्या कौशल्याने, स्वतःची नवीन ओळख, स्वतःची भक्कम जागा बनवतात. मात्र काहींच्या पदरी निराशाच येते. काही कलाकार आपली आपली जागा आणि ओळख तर निर्मण करतात मात्र ती टिकवून ठेवणे सगळ्यांनाच जमत नाही.

आपण असे अनेक कलाकारांबाबतीत पहिले आहे असे अनेक कलाकार आहेत, ज्यांचे सुरुवातीचे सिनेमा हिट ठरले, मात्र मिळालेलं स्टारडम त्यांना सांभाळता नाही आलं. आणि काळाच्या ओघात, बॉलीवूड देखील त्यांना विसरून गेले. आशिकी सिनेमामध्ये काम करणाऱ्या राहुल रॉय यांना, आपल्या पहिल्याच सिनेमातून प्रचंड लोकप्रियता मिळाली.

एकाच सिनेमाने त्यांना स्टार बनवले, मात्र त्यानंतर त्यांना कोणत्याही सिनेमात फारसं यश मिळालं नाही. हरीश कुमार यांच्याबाबतीत देखील असंच काही झालं. १९९१ मध्ये कपूर खानदानाची मुलगी, करिष्मा कपूरने प्रेम कैदी या सिनेमामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यासाठी अनेक मोठाल्या अभिनेत्यांच्या नावाची चर्चा होती.

मात्र, इतक्या मोठ्या सिनेमातून काम करण्याची संधी नवा अभिनेता हरीश कुमारला मिळाली. कपूर कुटुंबातील मुलीचा पहिला सिनेमा म्हणून सहाजिकच या सिनेमाची सगळीकडेच जोरदार चर्चा होती. मात्र या सिनेमामध्ये आपल्या दमदार अभिनयाने हरीश कुमारने देखील चांगलीच चर्चा रंगवली होती. त्याच्या कामाचे चांगलेच कौतुक करण्यात आले होते.

त्यानंतर त्याला अनेक सिनेमाची ऑफर सुरु झाली. मात्र त्याने प्रमुख पात्रालाच कधी प्राधान्य नाही दिले. सिनेमाचे कथानक आणि स्टारकास्ट याला त्याने प्राधान्य दिले. प्रेम कैदी सिनेमानंतर कदाचित तो कोणत्या सिनेमामध्ये प्रमुख भूमिकेत झळकला. तामिळ, तेलगू, कन्नड, आणि हिंदी अश्या साऊथच्या आणि बॉलीवूडच्या सिनेमामधून त्याने काम केलं.

हरीशने जवळपास २०० सिनेमामध्ये काम केले आहे. कुली नं १ या सिनेमामध्ये त्याचे आणि गोविंदाचे जवळपास सारखेच काम होते. या सिनेमा मध्ये देखील त्याच्या कामाची चांगलीच चर्चा झाली होती. त्याआधी तिरंगा या सिनेमामध्ये त्याने काम केले होते. नाना पाटेकर, राजकुमार यासारख्या दिग्ग्ज अभिनेत्यांसोबत त्याने काम केले.

अनेक हिंदी आणि साऊथच्या सिनेमामध्ये त्याने काम केले आहे. गोविंदासोबत देखील त्याने ऑंटी नं १ या सिनेमामध्ये काम केले आहे. साऊथचा बहुचर्चित सिनेमा, बुलंदी या सिनेमामधून अनिल कपूरने साऊथ इंडस्ट्रीमध्ये काम केलं होत. त्यामध्ये देखील हरीशने महत्वाची भूमिका साकारली होती. मात्र हळूहळू तो कुठे तरी गायबच झाला.

सिनेमामध्ये काम करत असताना आपल्या वाढत्या वजनावर तो नियंत्रण ठेवू नाही शकला. त्यामुळे पुढे त्याला हवे तसे काम मिळणे कमी झाले. सध्या तो कुठे आहे ते सांगणे अवघड आहे. गोविंदा २०११ मध्ये आ गया हिरो या सिनेमामधून बॉलीवूडमध्ये पुन्हा पदार्पण करणार होता.

त्याच सिनेमामध्ये हरीश कुमारची देखील महत्वाची भूमिका होती. मात्र दु’र्दैवाने तो सिनेमाचं रिलीज नाही झाला. हरीशने आपल्या वयाच्या अवघ्या १५ व्य वर्षी काम करायला सुरुवात केली होती, मात्र आज तो कुठे आहे हे कोणालाच ठाऊक नाही.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *