कधीकाळी ‘अशी’ दिसत होती ‘सारा अली खान’. तिचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही कधीच पाहिले नसतील..

बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या ‘लव्ह आज कल’ चित्रपटाचा ट्रेलर आज (17 जानेवारी) रिलीज झाला आहे. या ट्रेलरला सोशल मीडियावर संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. एकीकडे काही सोशल मीडिया यूजर्सच्या पसंतीस उतरले आहे, तर काही यूजर्स या चित्रपटाचे वर्णन जुने चित्रपट म्हणून करीत आहेत.
तथापि, प्रत्येकजण कार्तिक आर्यन आणि साराचे जोरदार कौतुक करीत आहे. सारा अली खान केवळ ट्रेलरमध्येच सुंदर दिसत नसून तिचा बोल्ड अवतारही तितकाच सुंदर दिसत आहे. पण आपण आज सारा अली खान बद्दल बोलणार आहोत आणि तिचे काही दुर्मिळ फोटो पाहणार आहोत.
त्याचबरोबर सारा अली खानच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलताना सारा ‘लव आज कल’ नंतर ‘कुली नंबर 1’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात वरुण धवन सारा अली खान सोबत दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन डेव्हिड धवन यांनी केले आहे. चित्रपटाशी संबंधित काही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.

सारा अली खान तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे देखील चर्चेत असते. सारा अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर करते. आणि तिचे चाहते तिच्या फोटोवर कमेंट आणि लाईक करण्यासाठी तुटून पडतात.
तसेच, सारा अली खान वयक्तिक जीवनासोबत तिच्या आणि बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनसोबतच्या संबंधांच्या बातम्यांमुळे चर्चेत आली होती. तथापि, काही दिवसांपूर्वी अशी बातमी समोर आली होती की, दोघांनी आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्यासाठी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. पण यावर दोघांनीही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

सारा अली खानच्या इंस्टाग्रामवर 17 मिलियन फॉलोअर्सवर आहेत. खूप कमी काळात साराने हा 17 मिलियनचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान सारा इन्स्टाग्रामवर फक्त 18 लोकांचं फॉलो करते. साराने इन्स्टाग्रामवर आतापर्यंत एकूण 309 पोस्ट केले आहेत. सारा अली खानची शेवटची पोस्ट तिच्या ‘लव आज कल’ या चित्रपटाचा ट्रेलर आहे.