कधीकाळी भाजी विकणारा मुलगा, आज आहे सर्वाधिक मानधन घेणारा ‘हा’ अभिनेता

कधीकाळी भाजी विकणारा मुलगा, आज आहे सर्वाधिक मानधन घेणारा ‘हा’ अभिनेता

मनोरंजन

मनोरंजन विश्वाला म्हणजेच चित्रपटसृष्टीला मायानगरी म्हणलं जातं. प्रसिद्धी आणि लोकप्रियतेच्या शिखरावर बसून, रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवावे असं जवळपास सर्वच कलाकारांचे स्वप्न असते. पण सर्व सामान्य आणि साधारण असणाऱ्या, कलाकारांपैकी खूप कमी कलाकारांचे स्वप्न पूर्ण होते. कौशल्याच्या सोबतीला, जिद्द आणि मेहनत असेल तर त्या कलाकारांचे स्वप्न नक्कीच पूर्ण होते.

मात्र, ज्या कलाकारांना कोणताही पूर्वीचा, बॅकग्राऊण्ड नाहीये अशा कलाकारांना आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी चांगलाच संघर्ष करावा लागतो. पण जेव्हा संघर्ष पूर्ण होऊन यश मिळते, तेव्हा खरोखर एखाद्या सीताऱ्यासारखा कलाकार मनोरंजनसृष्टीला लाभतो. असाच एक सितारा मराठी चित्रपटसृष्टीला देखील लाभला आहे. सावरखेड एक गाव, या सिनेमाचे नाव घेताच आपल्या समोर आज मराठीमधील अनेक सिताऱ्यांचे चेहरे समोर येतात.

मकरंद अनासपुरे, श्रेयस तळपदे, विक्रम गोखले, उपेंद्र लिमये, सोनाली खरे, श्रावणी जमेनीस आणि अंकुश चौधरी या सर्वांच्या जबरदस्त अभिनयामुळे आजही तो सिनेमा चाहत्यांच्या मानत आपली जागा बनवून आहे. या सिनेमामुळे, यामधील सर्वच कलाकारांना, एक नवीन ओळख मिळाली होती. त्यामध्ये, श्रेयस तळपदे आणि उपेंद्र लिमये यांनी तर बॉलीवूडमध्ये देखील आपल्या नावाचा डंखा वाजवला होता.

या सिनेमाच्या पूर्वी देखील अंकुश चौधरी आणि इतर कलाकारांनी अनेक सिनेमामध्ये काम केले होते. अंकुश चौधरीच्या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती. त्यानंतर त्याच्या करियरला एक कलाटणीच मिळाली. यंदा कर्तव्य आहे, या रोमँटिक सिनेमाने तर त्याला लोकप्रियतेच्या शिखरावरच नेऊन ठेवले. आई शप्पथ, माझा नवरा तुझी बायको, इश्श्य सारख्या सिनेमामध्ये त्याने आपल्या दमदार अभिनयाने सर्वाना मंत्रमुग्धच केले होते.

साडे माडे तीन या सिनेमामधून त्याने दिग्दर्शक म्हणून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते. तो सिनेमा देखील चांगलाच सुपरहिट ठरला. रंगा रंगा, लालबाग परळ, सिटी ऑफ गोल्ड, चेकमेट, दुनियागिरी सारख्या सुपरहिट मराठी सिनेमामध्ये त्याने काम केले आहे. आज मराठी सिनेसृष्टीमधील एक, सर्वात सुपरहिट अभिनेता म्हणून अंकुश चौधरीला ओळखले जाते.

आज, मराठी मनोरंजन विश्वामध्ये अंकुश चौधरी सर्वाधिक मानधन घेतो. मात्र, अंकुश चौधरीचा हा प्रवास अत्यंत जास्त संघर्षमयी होता. सुरुवातीच्या काळात, अंकुश चौधरीला आपल्या गरज पूर्ण करण्यासाठी, भाजी देखील विकावी लागली होती. एका मुलाखती दरम्यान आपल्या संघर्षाबद्दल बोलत असताना अंकुश चौधरी म्हणाला होता की, ‘संघर्ष करताना माणसाने कधीच लाज बाळगू नये असं मला वाटतं.

यश मिळवायचे असेल तर, तुमच्या वाटेला जो संघर्ष येईल तो करावाच लागतो. सुरुवातीच्या काळात, आपल्या उदरनिर्वाहासाठी आम्ही सुद्धा मिळेल ते काम केले. पण ते काम करताना लाज बाळगली नाही. एक वेळ अशी होती जेव्हा मी भाज्या विकल्या, पण धीर सोडला नाही. आणि आज अंकुश चौधरी तुमच्या समोर आहे.’ अंकुश चौधरी मराठी चित्रपटसृष्टीमधील, यारोंचा यार म्हणून ओळखला जातो. भरत जाधव, मकरंद अनासपुरे, केदार शिंदे सारख्या अभिनेत्यांचा तो खास मित्र आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *