कधी अमीरसोबत काम करणाऱ्या त्याच्या सख्ख्या भावावर आलीय बिकट परिस्थिती, रस्त्यावरचा वडापाव खाऊन काढतोय दिवस…

बॉलीवडूमध्ये घराणेशाही म्हणजेच नेपोटीझम अनेक वर्षांपासून सुरु आहे. केवळ काही वर्षांपासून याबद्दल लोक उघडपणे बोलत आहेत. घराणेशाहीचा जितका फायदा होतो, त्याचे नुकसान देखील तेवढेच आहे. प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण नाही करता आल्या, की प्रेक्षक त्या कलाकारांना पूर्णपणे नाकारतात.
असे अनेक उदाहरण आहेत की, आपल्या आई-वडिलांना इतका उत्कृष्ट अभिनय जमला नाही म्हणून त्यानंतर त्यांनी कितीही चांगला अभिनय केला तरीही प्रेक्षकांनी त्याला पूर्णपणे नाकारलेच. असेच काही घडले होते, बॉलीवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानच्या भावाबद्दल. अनेकांना माहित देखील नसेल की, अमीर खानचा भाऊसुद्धा एक अभिनेता होता.
त्यामध्ये तो म्हणाला होता की,’माझ्या कुटुंबीयांनी मला वे’ड करण्याचा डाव मांडला होता. बऱ्याच दिवसांपासून मला चुकीच्या गो’ळ्या देत होते. मला एक वर्षांहून अधिक काळापासून घरात डांबून ठेवले होते. सगळं काही मिळेल, पण मला घरातच रहावं लागेल. मला घराच्या बाहेर जाऊ दिले नाही. चुकीच्या गो’ळ्या देऊन मला वे’ड ठरवण्याचा प्रयत्न केला.
मी सगळं काही निमूटपणे स’हन केलं. मला वाटत होत की, माझ्या कुटुंबातील कोणाला तरी माझी दया येईल. माझ्या अवस्थेबद्दल कोणाचे तरी हृदय पिळवटेल, मात्र असं काहीच झालं नाही. माझी अवस्था अधिकच बि’कट होत गेली. ज्यावेळी, माझ्याकडून माझा सर्व हक्क काढून घेण्यासाठी कागदांवर माझी सही घेण्यात येऊ लागली तेव्हा मात्र माझा संयम सुटला.
मी आपल्या हक्कासाठी को’र्टाची पायरी चढली. त्यामध्ये मी केस जिंकलो सुद्धा. आता कुठे तरी पुन्हा नव्याने सर्व सुरु करण्याचा प्रयत्न मी करत आहे.’ या खुलास्यामुळे सगळीकडे प्रचंड गोंधळ उडाला होता आणि आमिर खानवर देखील प्रश्न उपस्थित केले गेले होते. आता पुन्हा त्याचे काही फोटो आणि एक व्हिडियो सगळीकडे वायरल होत आहे.
यामध्ये फैजल खान एका वडापाव च्या दुकानासमोर उभं राहून वडापाव खात आहे. हातात ग्लव्स, खांदयावर एक साईडबॅग आणि अगदी साधा शर्ट, या लूकमध्ये त्याला ओळखणे देखील अवघड झाले. लवकरच त्याचा फॅक्टरी नावाचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये त्याने अभिनय तर केलाच आहे, सोबत या सिनेमाचे दिग्दर्शन देखील केले आहे.
त्याच्या या सिनेमामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. १९६९ मध्ये प्यार का मौसम या सिनेमामधून फैजल खानने शशी कपूरच्या बालपणाचा रोल करत चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर कयामत से कयामत तक या सिनेमामध्ये त्याने खलनायकाची भूमिका रेखाटली होती. जो जिता वही सिकंदर, मदहोश,आणि मेला अशा सिनेमात त्यानं काम केलं आहे. मात्र त्याचा आता वायरल झालेल्या फोटोंवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. यासाठी थेट आमिर खानला देखील काहींनी दोषी ठरवलं आहे.