करीना कपूरच्या ‘या’ धक्कादायक प्रश्नावर भडकली सासू शर्मिला टागोर, म्हणाली ‘आजची पिढी..!’

सैफ अली खानची आई शर्मिला टागोर ही त्या काळातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. आईचा वारसा पुढे चालवत आज शर्मिला टागोर चा मुलगा सैफ आणि सैफ ची मुलगी सारा यांनी देखील बॉलिवूड मध्ये चांगलेच नाव रुपाला आणले आहे. आणि शर्मिला टागोर हिस देखील या गोष्टीचा अभिमान वाटत आहे.
एकीकडे मुलगा आणि नात यांनी बॉलिवूड मध्ये आपला चांगला बस बसविला असतानेच अभिनेत्री शर्मिला टागोर यांची सून करीना देखील बॉलिवूड मध्ये आपली प्रसिद्धीस काही कमी नाहीये. अगदी गरोदरपणात देखील करीना कपूर ही हार्ड वर्क करत असून सासू शर्मिला टागोर हिस देखील करिणाचे या कामाचा अभिमान वाटत आहे. परंतु करिणाचे एक फाजील प्रश्नावर सासू शर्मिला चांगलीच भडकली आणि आज आपण या लेखातून त्यामागील कारण जाणून घेणार आहोत.
जेव्हा ती करीना कपूरच्या चॅट शोमध्ये पहिली पाहुणी म्हणून पोहचली. करिनाने आपल्या सासूला हा प्रश्न विचारताच ती चि’डल्याचे दिसून आले. मीडिया रिपोर्टनुसार ती रागाने लाल झाली होती. परंतु नंतर तिने स्वत: ला सांभाळत मोठ्या शांततेने त्यास प्रतिसाद दिला.
वास्तविक, करिना कपूरने ‘व्हॉट वुमन वांट’ या नावाच्या चॅट शोचा एक नवीन सीझन आणला आहे. या कार्यक्रमाची पहिली पाहुणे म्हणून तिची सासू शर्मिला टागोर आली होती. या दरम्यान करीना कपूरने तिला बरेच प्रश्न विचारले. करीना ने विचारले की तूम्ही बिकनी घालणारी पहिली स्त्री आहात… करिनाला थांबवत मध्येच शर्मिला बोलली.
शर्मिला म्हणाली की मला वाटते की ‘संपूर्ण इतिहास यावरच लिहिला जाईल की शर्मिला टागोर आणि तिची बिकिनी…. मला वाटते की मी यामधून कधीच बाहेर पडू शकणार नाही.’ सासूच्या रागाची जाणीव झाल्याने करिनाने त्वरित विषय बदलून तिचे कौतुक करण्यास सुरवात केली. करिना म्हणाली की मला वाटते की त्यावेळी तो एक आइकोनिक मूवमेंट होता.
आजची पिढी याकडे असे बघते की बिकीनीमध्ये कोणी एवढे सुंदर कसे दिसू शकेल. ज्यावर तीची सासू म्हणाली की हो आता तू हेच बोलशील. आम्ही तुम्हाला सांगतो की करीना बर्याचदा आपल्या अॅक्टिव्हिटीबद्दल चर्चेत राहते. अलीकडेच, करीना दुसऱ्यांदा गर्भवती आहे. लवकरच ती दुसऱ्यांदा आई होणार आहे.