काम मिळत नसल्याने बिग बॉस विजेत्या ‘या’ अभिनेत्यावर आले वाईट दिवस ! परिस्थितीमुळे चालवावा लागतोय ढाबा….

काम मिळत नसल्याने बिग बॉस विजेत्या ‘या’ अभिनेत्यावर आले वाईट दिवस ! परिस्थितीमुळे चालवावा लागतोय ढाबा….

हिंदी आणि मराठी दोन्ही छोट्या पडद्यावर सध्या, एकाच रियालिटी शोची चर्चा सुरु असल्याचं बघायला मिळत आहे. बिग बॉस हा मनोरंजन विश्वातील सर्वात लोकप्रिय आणि मोठा रियालिटी शो समजला जातो. जगभरात बिग बॉसच्या शोचे असंख्य चाहते आहेत. बिग बॉस हिंदीच्या पंधराव्या सिझनला सुरुवात झाली आहे आणि बिग बॉस मराठीचा देखील हा तिसरा सिझन आहे.

दिवसेंदिवस या शोची लोकप्रियता चांगलीच वाढलेली, बघायला मिळत आहे. बिग बॉस हिंदीचा नवीन सिझन सुरु झाला की, त्याचे आधीचे स्पर्धक, घरामध्ये निर्माण झालेल्या परिस्थतीवर आपले मत व्यक्त करतात. सोशल मीडियावर त्याबद्दल चांगलीच चर्चा रंगते. या जुन्या स्पर्धांकमध्ये देखील अनेकवेळा, बिग बॉसच्या घरातील परिस्थतीवरून सोशल मीडियावर वा’द रंगल्याच बघायला मिळते.

काम्या पंजाबी, डेबोलीन भट्टाचार्जी, हिना खान, प्रियांक शर्मा, प्रिन्स यासारखे अनेक बिग बॉसच्या घरातील जुने सदस्य आपले मत नोंदवत असतात. त्यावरून आजही त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे, हे बघायला मिळते. मात्र काही बिग बॉसचे स्पर्धक आता कुठेच बघायला देखील मिळत नाहीत. विशेष म्हणजे, त्यामध्ये काहीनी बिग बॉसचा शो देखील जिंकला होता.

पहिल्या सीझनचा विजेता अभिनेता राहुल रॉय, त्यानंतर सिझन दोनचा विजेता आशुतोष कौशिक आणि सीजन दहाचा विजेता मनवीर गुज्जर आज कुठे आहे हे कोणालाच माहित नाही. यामध्ये सिझन दोनचा विजेता आशुतोष कौशिकने तर, रोडीज हा रियालिटी शोसुद्धा जिंकला होता. रोडीज हा रियालिटी शो जिंकून, एक सर्वसाधारण स्पर्धक म्हणून त्याने बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात आपला सहभाग नोंदवला होता.

त्यावेळी, त्याचा साधेपणा आणि गेम दोन्ही देखील प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरले. त्याआधीच रोडीजमध्ये आशुतोषने चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. बिग बॉस हिंदीच्या दुसऱ्या पर्वात देखील अनेक दिग्ग्ज सेलेब्रिटीज स्पर्धक म्हणून आले होते.

बिग ब्रदर फेम जेडे गुडी, राहुल महाजन, छोट्या आणि मोठ्या दोन्ही पडद्यावर आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री मोनिका बेदी आणि राखी टंडन यासारख्या अनेक दिग्ग्ज सेलेब्रिटीजने बिग बॉस हिंदीच्या दुसऱ्या पर्वात आपला सहभाग नोंदवला होता. मात्र या सगळ्यांना माघे सोडत, आशुतोष कौशिकने दुसरा सिझन जिंकून, तब्ब्ल एक कोटी रुपये जिंकले.

त्यानंतर, किसम्त पै’सा लव्ह, भडास, जिल्हा गाजियाबाद सारख्या हिंदी सिनेमामध्ये देखील तो झळकला होता. काही हिंदी रियालिटी शोमध्ये देखील काम केलं होते. मात्र अचानकच तो कुठे तरी गायब झाला. तो सध्या कुठेच दिसत नाहीये. मग हा आशुतोष नक्की करतो तरी काय? तर सध्या आशुतोष आपल्या गावाकडे, दोन ढाबे चालवत आहे.

त्याला, फारसे काम मिळाले नाही. म्हणून तो आनंदाने आपले दोन ढाबे चालवत आहे. याबद्दल आशुतोष एकदा म्हणाला होता की,’भाकरीची काहीच अडचण नाही. आम्ही आमच्या ढाब्यावर लोकांना जेवण देतो. मी नोएडाच्या वृत्तवाहिनीसाठी वेळोवेळी शो करतो. जर मला मुंबईहून एखाद्या प्रोजेक्टसाठी फोन आला तर मी शूटसाठी जातो आणि परत येतो.’ ढाब्यांसोबत उत्तराखंडमध्ये त्याच एक कपड्यांचं शोरूम देखील आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *