काष्ठी साडी नेसून टेबल टेनिस खेळणाऱ्या ‘या’ महिला कोण माहिती आहे का? 90 वर्षपूर्वीच्या ‘या’ फोटोमागच सत्य जाणून हैराण व्हाल….

काष्ठी साडी नेसून टेबल टेनिस खेळणाऱ्या ‘या’ महिला कोण माहिती आहे का? 90 वर्षपूर्वीच्या ‘या’ फोटोमागच सत्य जाणून हैराण व्हाल….

भारतामध्ये सध्या महिलांना वेगवेगळ्या क्षेत्रात वाव आहे. महिलांना विविध क्षेत्रात आता काम देखील करता येत आहे. पूर्वीच्या काळी असे नव्हते. पूर्वीच्या काळी महिलांना घरातल्या घरातच काम करावे लागत असे. त्यातल्या त्यात वि’धवा महिला जर असतील तर त्यांना इतरांच्या घरी जाऊन काही काम करुन आपला उदरनिर्वाह चालवावा लागायचा.

मात्र, सध्याच्या जमान्यात महिला या उच्च पदावर जाऊन पोहोचलेल्या आहेत. आता भारतामध्ये देखील अनेक महिला प्रगतीपथावर असल्याचे दिसत आहेत. अनेक खेळांमध्ये त्यांनी मोठे यश मिळवले आहे. यामध्ये आपल्याला सायना नेहवाल हिचे नाव घेता येईल. सायना नेहवाल हिने आपल्या देशाचे नाव अतिशय मोठे केले आहे. त्याचप्रमाणे सानिया मिर्झा ही देखील उत्तम टेनिसपटू आहे.

त्यांना कमी लेखण्याची चूक कोणीही करू नये. सांगली जिल्ह्यातील असलेली स्मृती मानधना हिनेदेखील क्रिकेटच्या विश्वामध्ये अतिशय उत्तम अशी कामगिरी केलेली आहे. अतिशय छोट्या जिल्ह्यातून येऊन तिने हे यश मिळवले आहे. महिलांचा क्रिकेट संघ भारतामध्ये आता खूप चांगल्या प्रकारे खेळत असल्याचे दिसत आहे. येणाऱ्या काळामध्ये अजून चांगली प्रगती हा संघ करू शकतो.

याप्रमाणे हॉकीच्या खेळांमध्ये अखिल भारतीय महिला संघाने चांगली कामगिरी केलेली आहे. साधारणत चाळीस ते पन्नास वर्षापूर्वी भारतामध्ये महिलांना हवे तसे स्वातंत्र्य नव्हते. मात्र, अनेक मराठी क्रांतिकारी महिला देखील या देशांमध्ये जन्माला आलेल्या आहेत. त्यांनी उत्तुंग असे कार्य केलेले आहे. यातीलच एक नाव म्हणजे रमाबाई रानडे यांचे.

रमाबाई रानडे यांनी पुणे शहरात महिलांसाठी अतिशय चांगले काम केले होते. तसेच त्यांनी राज्यामध्ये देखील चांगले काम केले. महिलांना स्वावलंबन त्यांनी शिकवले. त्याचप्रमाणे इतरांच्या जीवावर न राहता आपण आपली कमाई कशी करावी, याचा परिपाठ देखील त्यांनी घालून दिला होता.

तसेच महिलांनी विविध खेळ खेळावे, असे त्यांना वाटत होते. त्या देखील उत्तम खेळाडू होत्या. काष्टा साडी घालून त्या टेनिस चांगल्या प्रकारे खेळायच्या. टेबल टेनिस हा प्रकार त्या काळात नवीन आला होता. त्या देखील टेनिस खेळायच्या. त्याचबरोबर त्यांच्या आश्रमात असलेल्या महिलांना देखील त्यांनी टेनिस शिकवले होते.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *