कीर्ती सुरेश लवकरच तोडणार चाहत्यांचे हृदय, पहा ‘या’ अभिनेत्याची बनणार पत्नी…

चित्रपट निर्माते सुरेश कुमार आणि अभिनेत्री मेनका यांच्या कन्या म्हणजे कीर्ती सुरेश होय. कीर्तीने वयाच्या आठव्या वर्षी बालकलाकार म्हणून आपल्या वडिलांच्या निर्मिती असलेल्या मालिकेत काम करण्यास सुरुवात केली होती.
त्यानंतर अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या मल्याळम भाषेतला ‘गीतांजली’ या हॉरर चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून पहिल्यांदा काम केले होते. मल्याळम नंतर तमिळ चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. तमिळमध्ये आघाडीचा अभिनेता शिवकार्थिकेयन, धनुष, विजय, सूर्या आणि विक्रम यांच्यासोबत मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले.
पण हाती आलेल्या वृत्तानुसार हे दोघे लवकरच लग्न करणार आहेत, तथापि असे म्हणतात की कीर्तीने सुद्धा या नात्यास सहमती दर्शविली आहे, तथापि या संदर्भात अद्याप किर्ती कडून कोणतेही निवेदन आले नाही. पण कीर्तीच्या चाहत्यांना आशा आहे की ती लवकरच लोकांना याबद्दल सांगेल.
तसेच कीर्ती लवकरच महेश बाबूसमवेत ‘सरकारू वारी पटा’ या चित्रपटात दिसणार आहे. दोघांनीही या चित्रपटाचे पहिला काही भाग पूर्ण केला असून आता ते दुसर्या भागाचे काम करण्यात व्यस्त आहेत. तसेच लवकरच कीर्ती बॉलीवूडमध्ये सुद्धा पदार्पण करणार आहे.
किर्ती सुरेश पुढच्या वर्षी अजय देवगणच्या ‘मैदान’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करेल. हा चित्रपट फूटबॉल प्रशिक्षक सैय्यद अब्दुल रहीम यांच्यावर आधारीत आहे. पण किर्ती सुरेश सध्या तेलगू आणि तामिळ चित्रपटात बिझी आहे. पण हीच किर्ती आता बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय.
कीर्तीसाठी २०१८ वर्ष खूप महत्वाचे होते, यावर्षी ‘महानटी’ या ७० च्या दशकात दक्षिण भारतातील सर्वात लोकप्रिय असलेली अभिनेत्री सावित्री यांच्या बायोपिक मध्ये मुख्य भूमिका कीर्ती साकारणार होती. त्यामुळे सर्व फिल्म इंडस्ट्रीचे लक्ष या चित्रपटाकडे होते.
अपेक्षेप्रमाणे हा चित्रपट सुपरहिट झाला आणि कीर्ती सुरेशच्या अभिनयाचे कौतुक झाले. तिच्या मेहनतीचे फळ म्हणजेच ६६ व्या राष्ट्रीय पुरस्कारामध्ये तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला.