कृतीशील लोकनेता! राज्यपाल राहिलेले खासदार स्वतः शेतात गहू काढत शेतीसाठी करतात प्रेरित..वाचा सविस्तर

कृतीशील लोकनेता! राज्यपाल राहिलेले खासदार स्वतः शेतात गहू काढत शेतीसाठी करतात प्रेरित..वाचा सविस्तर

शेतकरी म्हणजेच आपला बळीराजा शेतात राब राब राबल्यानंतर सर्वसामान्यांना घरात बसून जेवायला मिळते. मात्र, असे असले तरी शेवटी शेतकऱ्यांना अनेकदा हवामानाचा फटका देखील बसतो. खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर शेतीचे खूप मोठे नुकसान होते आणि एखाद्या वेळी पाऊस जर नाही पडला तर काही शेतात उगवतच नाही.

शेती करणे हे खूप कठीण काम आहे. शेती करायची म्हणजे त्यामध्ये स्वतः कष्ट करावे लागतात. सध्या लॉक डाऊन असल्यामुळे शेतामध्ये काम करायला मजूर देखील मिळत नाही. त्यामुळे अनेकांना स्वतः शेतात राबावे लागत आहे. शेतामध्ये आता गहू कापणीला आलेला आहे. गहू कापणी करताना मजूर मिळेनासे झाले आहेत.

आता आपल्याला लक्षात आले असेल आम्ही कोणाबद्दल बोलत आहोत ते. हे आहेत सध्याचे सातारचे खासदार श्रीनिवास पाटील. होय श्रीनिवास पाटील यांनी यंदाची लोकसभा ही उदयनराजे भोसले यांचा पराभव करून मिळवली आहे. ही देशात गाजलेली निवडणूक होती कारण शरद पवार यांनी भर पावसात सभा घेऊन सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यानंतरच राज्याच्या राजकारणात देखील उलथापालथ झाल्याचे पाहायला मिळाले.

श्रीनिवास पाटील या आधी देखील खासदार राहिले होते. त्यांनी तत्कालीन खासदार पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला होता. 1999 ते 2004 या कालावधीत खासदार राहिले. त्यानंतर 2009 मध्ये देखील ते खासदार झाले होते. त्यावेळेस त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला होता. पृथ्वीराज चव्हाण यांचे वडील आनंदराव चव्हाण आणि आई प्रेमिला चव्हाण यादेखील विजयी निवडणुका लढलेल्या आहे.

मात्र, असे असतानाही श्रीनिवास पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता आणि लोकसभेत ते पोहोचले होते. श्रीनिवास पाटील हे सिक्कीमचे राज्यपाल राहिले आहेत. एक जुलै 2013 रोजी त्यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली होती. त्यांचे शिक्षण सातारा येथे झाले होते. त्यानंतर ते शिकण्यासाठी पुण्यात गेले, त्यावेळी त्यांना कर्मवीर भाऊराव पाटील आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांचा सहवास लाभला होता.

त्यानंतर यशवंतराव चव्हाण आणि धनंजय गाडगीळ यांचे त्यांना मार्गदर्शन मिळाले. त्यानंतर ते जिल्हाधिकारी देखील झाले. 11 फेब्रुवारी 1941 रोजी त्यांचा जन्म झालेला आहे. काही दिवसापूर्वी काही फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये खासदार श्रीनिवास पाटील हे आपल्या शेतामध्ये गव्हाची काढणी दिसत करताना दिसत आहेत.

यामध्ये त्यांनी टी शर्ट आणि पॅंट घातलेली आहे. डोक्यावर फेटा बांधलेला आहे आणि हातात वीळा घेऊन ते गहू कापताना दिसत आहेत. आपल्या काळ्या आईची सेवा करण्याची संधी मिळाली, असे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करताना सांगितले आहे. त्यांच्या या फोटोला खूप जणांनी लाईक केलेले आहे.

एक राज्यपाल राहिलेला व्यक्ती आणि सध्या खासदार असलेला व्यक्ती शेतात अशा प्रकारे काम करतो याची चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे. रांगडी बाण्यामुळे श्रीनिवास पाटील हे लोकांमध्ये कायम चर्चेत असतात. त्यांना कोणीही भेटायला गेले तरी ते आपुलकीने चौकशी करतात. त्यामुळे ते अतिशय लोकप्रिय असे आहेत.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.