कोणत्याही मुद्द्यावर बॉलिवूडमधील 3 खान मौन का बाळगतात?; सिरुद्दीन शाह यांनी केला खुलासा..

कोणत्याही मुद्द्यावर बॉलिवूडमधील 3 खान मौन का बाळगतात?; सिरुद्दीन शाह यांनी केला खुलासा..

कोणतीही महत्त्वाची घडामोड घडली की त्यावर सेलिब्रिटीही व्यक्त होत असतात. त्या घटनेबाबत आपलं मत स्पष्टपणे मांडतात. पण बॉलिवूडमधील तीन खान मात्र कोणत्याही मुद्द्यावर बोलताना दिसत नाहीत. कायम ते मौन बाळगतात. असं का? यामागील नेमकं कारण अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी सांगितलं आहे.

अ’फगाणि’स्तानमध्ये ता’लिबा’नची सत्ता आल्यानंतर भारतीय मु’स्लिमांनी केलेल्या काही वक्तव्यांवर नसिरुद्दीन शाह यांनी अलिकडेच एक टिप्पणी केली होती. ती खूप व्हा’यरल झाली होती. मु’स्लिम असल्यामुळे आपल्याला कधीच बॉलिवूडमध्ये भे’दभा’वाची वागणू’क मिळाली नसल्याचंही त्यांनी सांगितलं. आता त्यांनी सरकारच्या प्रपोगंडा फिल्म्सबद्दल.

‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत नसिरुद्दीन म्हणाले, ‘सध्या प्रपोगंडा फिल्म्सचा काळ आहे. सरकार, तसंच सरकारचे समर्थक आणि लोकप्रिय नेत्यांवर आधारलेले, त्यांच्या कार्याचा उदोउदो करणारे सिनेमे बनवण्याचा काळ आहे. अशा सिनेमांच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन दिलं जातं. आर्थिक मदतही केली जाते.

अशा फिल्म्स तयार केल्या, तर त्या करणाऱ्यांना क्लीन चिट दिली जाण्याचं वचनही दिलं जातं. ज्या तऱ्हेचे बिग बजेट सिनेमे येत आहेत, ते पाहून हे लक्षात येतं,’ बॉलिवूडमध्ये मोठे निर्माते आणि अभिनेत्यांना सरकारचं कौतुक करणारे सिनेमे बनवण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

त्या बदल्यात त्यांना क्लीन चिट देण्याचं वचन दिलं जात की नाही, याबद्दल आत्ता आपल्या हाती पुरावा नसल्याचं त्यांनी सांगितलं; मात्र ज्या प्रकारचे सिनेमे सध्या तयार होत आहेत, त्यावरून हे स्पष्टपणे कळत असल्याचं शाह म्हणाले. मोठ्या व्यक्ती त्यांच्या कट्टरतावादाच्या अजेंड्याला लपवू शकत नाहीत, असंही शाह यांनी म्हटलं आहे.

‘चित्रपटसृष्टीत कलाकारांना एखाद्या गोष्टीवर व्यक्त होण्यासाठी भाग पाडलं जातं. आमीर खान, सलमान खान आणि शाहरुख खान या बॉलिवूडच्या तीन खानांनी मात्र आजपर्यंत कोणत्याच विषयात आपलं मत व्यक्त केलेलं नाही. ते काही बोलले, तर त्यांना किती त्रा’स दिला जाईल, याची त्यांना कल्पना आहे. तो त्रास केवळ आर्थिक स्वरूपाचा नसेल, तसंच केवळ काही एंडॉर्समेंट गमावण्यापुरता मर्यादित नसेल.

त्यांच्या साऱ्या एस्टॅब्लिशमेंटलाच त्रास दिला जाईल. म्हणूनच ते बोलत नाहीत. कारण बरंच काही गमावण्याची भी’ती त्यांना आहे. जो कोणी बोलण्याची हिंमत करतो, त्याला त्रा’स दिला जातो. हे फक्त मी किंवा जावेदसाहेबच (अख्तर) नव्हे, तर राइट विंग मा’नसिक’तेच्या वि’रोधात बोलणाऱ्या प्रत्येकालाच हे स’हन करावं लागतं. हे दोन्ही बाजूंनी वाढत आहे.’, असं ते म्हणाले.

गेली पाच दशकं भारतीय सिनेमासृष्टीत कार्यरत असलेल्या नसिरुद्दीन शाह यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ‘निशांत’, ‘आक्रोश’, ‘मिर्च मसाला’, ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है’, ‘जुनून’, ‘मंडी’, ‘अर्ध सत्य’, ‘जाने भी दो’ असे काही उत्तम सिनेमे त्यांनी केले आहेत. ‘वेन्स्डे’ सिनेमातली त्यांची भूमिका विशेष गाजली होती.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *