कौतुकास्पद ! काबूलच्या भी’षण गो’ळीबा’रातून अमरावतीच्या ‘या’ मराठमोळ्या पोरीने १२९ भारतीयांना सुखरूप आणले मायदेशी !

नीरजा भानोत, एक असं नाव जे कदाचित कोणाच्या लक्षात देखील नसत आलं. मात्र त्यावर सिनेमा बनला आणि, भारताच्या मुलीचे कर्तृत्व संपूर्ण जगाला समजले. काळाच्या ओघात, अनेक कर्तृत्व विसरून जातात. मात्र काही असे कर्तृत्व असतात, ज्यांना ओळखीची गरज नसते.
नीरजा भानोत यांनी दाखवलेला शौर्य अतुलनीय होते, मात्र त्याबद्दल सर्वाना खास करून नवीन पिढीला फारसी माहिती नव्हती. सिनेमामध्ये, त्यावेळी झालेल्या थरार दृश्याचे हुबेहूब रूपांतर केले गेले, आणि ते बघून सर्वांच्याच अंगावर काटा आला. भारताची मुलगी किती शौर्यवान असू शकते, याचा पुन्हा एकदा परिचय झाला.
129 भारतीय आणि इतर प्रवाशांना घेऊन या त’णावपूर्ण वातावरणातून एअर इंडियाचं विमान आज भारतात दाखल झालं. या बि’कट प’रिस्थितीमध्ये विमानातील हवाई सुंदरी म्हणजेच एअर होस्टेस ‘श्वेता शंके’ ने आपले कर्तव्य बजावत मोठी कामगिरी केली आहे. एआय 244 या विमानाने काल मध्यरात्री 129 भारतीयांना घेऊन विमानतळ वरून यशस्वीपणे उड्डाण घेतले आहे.
एअर इंडियाच्या विमानात अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मधील श्वेता शंके ही हवाईसुंदरी सहभागी होती. आपल्या जीवाची कसलीच पर्वा न करता, श्वेता शंके हिने अगदी समर्थपणे आपले कर्तव्य बजावले आहे. अडचणीत सापडलेल्या आपल्या देशवासीयांची सुटका करणे, त्यांना मार्गदर्शन करीत सुखरूप आपल्या कार्यकुशलतेवर त्यांना धीर देत श्वेताने आपल्या धाडसाचा परिचय संपूर्ण जगाला करुन दिला आहे.
129 भारतीयांना परत घेऊन येण्यामध्ये, श्वेताचे सर्वात जास्त योगदान आहे आणि त्यामुळे सर्वच स्तरातून श्वेताचा कौतुक केले जात आहे. अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील दूरध्वनीवरून तिची विचारपूस करत तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘तुझ्यासारख्या कर्तुत्ववान मुलींमुळेच आज भारताचे नाव उंचावले आहे,’ असे यशोमती ठाकूर तिला म्हणाल्या.
तसेच कोणतीही अडचण आली असल्यास लगेच माझ्याशी संपर्क साधावा असा धीर देखील दिला. काबुलची परिस्थिती अतिशय गं’भीर असून एअर इंडिया एअरलाइन्सने आपले विमान लँड केलं, त्यावेळी अचानकच फा’यरिंगचे आवाज सुरू झाले. मात्र त्या परिस्थितीत देखील आपल्या देशवासीयांना विमानात बसून तेथून उड्डाण घेणे सर्वात महत्त्वाचे होते.
ते काम विमानातील संपूर्ण क्रूने आणि खास करून श्वेताने अगदी चोख बजावले. तिच्या या धाडसाबद्दल तिच्या आई-वडिलांनाच नाही तर, संपूर्ण महाराष्ट्राला तिचा सार्थ अभिमान वाटतोय. तिथे पोहोचले तेव्हा ता’लिबा’नी विमान लॅन्ड करू देत नव्हते.
काही वेळानंतर हे विमान का’बूलच्या एअरपोर्टवर उतरलं आणि भारतीयांना सुखरूप परत देखील घेऊन आले. या विमानात कामगिरी करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. त्यात आपल्या जिवाची पर्वा न करता स्वतःचे काम स्वतः बजावणाऱ्या श्वेता शंकेचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.