क्रिकेट प्रेमींसाठी धक्कदायक बातमी ! T-20 वर्ल्ड-कप मधून कॅप्टनेच घेतली माघार..

क्रिकेट प्रेमींसाठी धक्कदायक बातमी ! T-20 वर्ल्ड-कप मधून कॅप्टनेच घेतली माघार..

क्रिकेटप्रेमींसाठी सध्या पर्वणीच सुरु आहे. नुकतंच आयपीएलचे सामने संपले आहेत. मात्र, आता लगेच टी-२० वर्ल्ड कप सुरु झाला आहे. एकाहून एक, रोमांचकारी सामने सध्या बघायला मिळत आहेत. म्हणून, सध्या क्रिकेटप्रेमी आनंदाने सर्व सामने बघण्याचा आनंद घेत आहेत. आज, भारत आणि पाकिस्तानचा ती-२० वर्ल्ड कप मधला मोठा सामना आहे.

या सामन्याचे सगळीकडेच चांगलीच तैयारी सुरु आहे. भारत-पाकिस्तानचा सामना या सिरीजमधला एक मोठा सामना आहे. त्यामुळे या सामन्यासाठी उत्सुकता खूप जास्त वाढली आहे. नेहमीच हा सामना सगळ्यात रंजक ठरतो. या सामन्याचा क्रिकेटप्रेमी आनंद घेण्यासाठी खूप आतुर आहेत. मात्र आता, या क्रिकेटप्रेमींच्या आनंदावर विरजण पडले आहे.

एका सर्वात मोठ्या आणि दिग्ग्ज खेळाडू आता, टी-२० वर्ल्ड कपच्या सामन्यांमधून माघार घेतली आहे. टी-20 वर्ल्डकप सुरु झाल्यापासून, प्रत्येक देशाचा संघ जिंकण्याची तैयारी करतेय. पण, न्यूझीलंडसाठी आणि न्यूझीलंडच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत धक्कादायक बातमी पुढे आली आहे. न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार, केन विलियम्सन वर्ल्डकपचे काही सामने खेळणार नसल्याचे सांगितले जात आहे.

केनच्या हाताच्या कोपऱ्याला चांगलीच दुखापत झाली आहे. आणि तेव्हापासून, तो काही सामने मुकण्याची शक्यता आहे.आलेल्या, बुधवारी झालेल्या सराव सामन्यामध्ये इंग्लंडने न्यूझीलंडचा १३ धावांनी पराभव केला. या सामन्यामध्ये, केन खेळत होता. मात्र विल्यमसन सामन्यात क्षेत्ररक्षण करताना तर दिसला, पण त्याने खबरदारी म्हणून सामन्यामध्ये फलंदाजी केली नाही.

न्यूझीलंड टीमचे मुख्य कोच गॅरी स्टीड यांनी सांगितलं की,’पहिल्या सराव सामन्यानंतर विलियम्सनची कोपराची दुखापत खूपच जास्त बिकट झाली आहे. विलियम्सनने त्या सामन्यात 30 चेंडूत 37 धावा केल्या होत्या, पण न्यूझीलंडला तीन विकेटने पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. आमच्या सर्वात मोठ्या आणि महत्वपूर्ण खेळाडूंपैकी एक विल्यम्सन आहे.त्यामुळे त्याचे खेळणे आमच्या संघासाठी खूप महत्वाचे आहे.’

पुढेच, विलियम्सन काही सामन्यांमध्ये बाहेर राहण्याच्या शक्यतेबद्दल देखील विचारले. त्यावेळी, स्टीडने एका वेबसाईटला सांगितलं की, ‘याबद्दलची शक्यता नक्कीच आहे. आम्हाला आशा आहे की, तो योग्य विश्रांती आणि संतुलन राखून खेळूच शकेल.’ न्यूझीलंडला, मंगळवारी पाकिस्तान सोबत सामना करायचा आहे. परंतु उर्वरित चार सुपर-12 सामने, केवळ सात दिवसांच्या आतच खेळावे लागणार आहेत.

ज्यामध्ये केनला, विश्रांतीची शक्यता खूपच कमी आहे. यामध्ये स्टीड पुढे म्हणाले, ‘गोलंदाजांची चांगलीच धुलाई करणाऱ्या फलंदाजांपैकी केन हा एक आमचा सर्वात चांगला खेळाडू आहे. तो त्याच प्रकारे तैयारी देखील करत आहे. मात्र, कधीकधी यामुळे भरपूर नुकसान होतं. आम्ही योग्य संतुलन साधण्याचा प्रयत्न करीत आहोत.’

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *