‘गिरीश कर्नाड’ यांनी ‘हेमा मालिनीशी’ लग्न करण्यास दिला होता नकार, कारण फक्त एवढं की हेमा मालिनीने एक वेळा..

‘गिरीश कर्नाड’ यांनी ‘हेमा मालिनीशी’ लग्न करण्यास दिला होता नकार, कारण फक्त एवढं की हेमा मालिनीने एक वेळा..

‘किसी शायर की नजर ड्रिमगर्ल’ हे गाणं, बॉलीवूड मधील सर्वात सुंदर अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. त्यांचे सौंदर्य बघता खऱ्या अर्थाने ते गाणं त्यांच्यासाठीच बनलं आहे, असंच वाटतं. हेमा मालिनी यांनी, संपूर्ण देशाला आपल्या सौंदर्याची भुरळ घातली होती. संपूर्ण देशातच काय तर देशाच्या बाहेर जगभरात त्यांचा मोठा चाहतावर्ग होता.

आजही हेमा मालिनी यांचा मोठा चाहतावर्ग कायम आहे. आजही अनेकांच्या मनात, त्यांची खास अशी जागा आहे. त्यांनी अनेक सिनेमामध्ये आपल्या सौंदर्याने आणि सुंदर अशा हास्याने, प्रेक्षकांना भुरळ घातली होती. हेमा मालिनी खऱ्या अर्थाने,त्यावेळी अनेकांच्या ड्रिमगर्लच होत्या. अनेक उद्योगपती, नेते, आणि कलाकार त्यांच्यासोबत लग्न करायचे स्वप्न बघत होते.

पण हेमा मालिनीचे प्रेम धर्मेंद्र यांच्यावरच होते, आणि त्यांनी धर्मेंद्र आधीच विवाहित असताना त्यांच्यासोबत विवाह देखील केला. संजीव कपूर यांचे हेमा मालिनीवर खूप प्रेम होते. आणि म्हणूनच त्यांनी आयुष्यभर इतर कोणाशीही लग्न केले नाही. जिथे कित्येक अभिनेते, दिग्दर्शक-निर्माते हेमा मालिनीसोबत लग्न करण्यासाठी आतुर होते तिथे, एका अभिनेत्याने मात्र त्यांच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला होता.

दोन वर्षांपूर्वी अभिनेता गिरीश कर्नाड यांचा मृ’ त्यू झाला. मात्र त्यांच्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी सिनेसृष्टीमधील अनेक वेगवेगळ्या गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. मालगुडी डेज मधून गिरीश कर्नाड घराघरात पोहोचले होते. त्यांनी अनेक, हिंदी आणि तामिळ, तेलगू सिनेमामध्ये काम केले आहे. गिरीश कर्नाड यांनी नेहमीच हटके असे पात्र, निभावले आणि आपली वेगळी जागा मनोरंजन जगात बनवली होती.

१९७४-७५ दरम्यान गिरीश कर्नाड पुण्यातील FTII संस्थेच्या अध्यक्षपदी होते. त्यावेळी त्यांना हेमा मालिनी यांच्या लग्नाचा प्रस्ताव त्यांना आला होता. कर्नाड यांनी आत्मचरित्रात लिहिलं आहे की, ‘त्यावेळी जया चक्रवर्ती ‘स्वामी’ या चित्रपटाची निर्मिती करत होत्या. त्या सिनेमामध्ये मी मुख्य भूमिका साकारावी अशी त्यांची इच्छा होती.

त्यानुसार मला, त्यांच्याकडून आमंत्रणं येऊ लागली होती. हळूहळू मला त्यामागचा त्यांचा हेतू समजला. हेमा मालिनीसाठी त्या मुलगा शोधत होत्या आणि तेव्हाच हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या प्रे’मप्रकरणाच्या चर्चा होत्या. हेमा मालिनी यांच्या जीवनाची नवी सुरुवात व्हावी अशी त्यांची खूप इच्छा होती. तेव्हा हेमा मालिनी बॉलिवूडमध्ये एक यशस्वी आणि अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री होत्या.

जया चक्रवर्ती यांनी ‘रत्नदीप’ चित्रपटात हेमा मालिनी आणि कर्नाड यांची मुख्य भूमिकांसाठी निवड केली होती. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच हेमा मालिनी यांनी कर्नाड यांना विचारलं होत की, “आपल्या लग्नाच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये छापून येत आहेत. याबद्दल तुमचं काय मत आहे?” त्यावर मी त्यांना म्हणालो की, “माझ्यासाठी बातम्या काय म्हणतात हे महत्त्वाचं नाही.

माझ्याकडे एक विशेष कारण आहे, ज्यामुळे मी लग्नासाठी नकार देतोय.” त्याबद्दल गिरीश पुढे लिहतात, ‘हेमा मालिनी यांच्याशी मी लग्न करणं खरोखर अशक्य होतं. त्यावेळी सरस्वतीला मी लग्नासाठी विचारलंसुद्धा नव्हतं. तिने नकार दिला असता तरी देखील, मी हेमा यांच्याशी लग्न केलंच नसतं. कारण, एकदा मी हेमा यांना विचारलं होतं की, तू तमिळ चित्रपटांमध्ये का काम करत नाहीस? त्यावर ती हसून म्हणाली की, तिथली माणसं किती जास्त काळी असतात. त्या प्रसंगानंतर माझ्या दृष्टीने हेमा मालिनी हे प्रकरण सं’पलं होतं.’

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *