गुटगुटीत गाल, बोलक्या डोळ्यांची फोटोमध्ये दिसणारी चिमुकली आज आहे बॉलिवूडची सर्वात श्रीमंत आणि हॉ’ट अभिनेत्री….

आपल्यातील अनेक जणांना सेलिब्रिटींचं वैयक्तिक आयुष्य जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. आता आपल्यामधीलच काही लोक टीव्हीवर हँडसम दिसणारा अभिनेता आणि ब्युटीफूल दिसणारी अभिनेत्री लहानपणी कसे बरे दिसत असतील, असा विचार करून कित्येक जण त्यांचे लहानपणीचे फोटो शोधतात. काही सेलिब्रिटी स्वतःच आपले असे काही फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर करतात.
तसेच आपल्याला माहित असेल कि सोशल मिडीयावर गेल्या काही महिन्यांपासून थ्रोबॅक फोटो आणि जुन्या आठवणी पोस्ट करण्याचा ट्रेंड पाहायला मिळतोय. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार यानिमित्ताने त्यांचे लहानपणीचे फोटोही पोस्ट करताना दिसत आहेत.
तिच्या बालपणाचा हा फोटो तिने आपल्या चाहत्यांसह शेअर केला आहे. तिचा हा गोंडस अवतार तुम्हालाही तिच्या प्रेमात पाडेल. बोलके डोळे, स्टाईल याची झलक या फोटोमध्ये स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळेच की काय बालपणापासूनच ती चित्रपटसृष्टीशी जोडली गेलेली आहे.
सोशल मीडियावर व्हाय’रल झालेल्या या फोटोमध्ये चिमुकली सोनम गोड हसताना दिसत आहे. होय ही सोनम कपूरच आहे, सध्या या फोटोनं सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सोनम आता जेवढी सुंदर दिसते तेवढीच ती बालपणीही गोड आणि निरागस दिसायची असं म्हटलं तरीही काही वागवं ठरणार नाही. बालपणीच्या या फोटोमध्ये सोनम खूपच क्यूट दिसत आहे.
2018 मध्ये सोनमने आनंदशी लग्न केले. सोनम व आनंदची लव्हस्टोरी अफलातून आहे. खरे तर आनंद त्याच्या एका मित्रासोबत सोनमला डेटवर पाठवू इच्छित होता. त्यानिमित्तानेच दोघांची भेट झाली होती. पण सोनमला पाहताच आनंद आपल्या मित्राला विसरला आणि स्वत:च सोनमच्या प्रेमात बु’डाला.
पहिल्या भेटीनंतर सोनम व आनंद एकमेकांच्या आणखी जवळ आलेत. रात्ररात्र दोघांच्या गप्पा सुरु झाल्यात. महिनाभरानंतरच आनंदने सोनमला प्रपोज केले मे 2018 मध्ये दोघांनीही लग्न केले. तेव्हा लग्नानंतर माध्यमांशी बोलताना तिने सांगितले होते की, आमचे दोघांचे लग्न फक्त आमच्या कुटुंबाच्या आनंदासाठी झाले आहे. आनंद आणि मी लग्नापूर्वीपासून एकमेकांना ओळखत होतो आणि एकमेकांना डेटही करत होतो.
मुळात लग्नानंतरही आनंद आणि सोनम एकमेकांसोबत जास्त वेळ घालवत नाहीत. दोघेही आपल्या करियरमध्ये इतके व्यस्त असतात की दोघांनाही एकमेकांसाठी वेळच मिळत नाही. सोनमने एका मुलाखतीत सांगितले होते की, “आनंद बर्याचदा मुंबईत कामानिमित्त येत असतो, कामाच्या निमित्ताने बहुतेक वेळ तो मुंबईत घालवतो.
रिपोर्टनुसार आनंद आहूजाची वार्षिक कमाई 450 दशलक्ष डॉलर्स इतकी आहे, जी भारतीय चलनानुसार 3000 कोटी इतकी आहे. आनंद फॅशन ब्राँड इँंल्ली चा मालक आहे. आनंदची आणखी एक वेगळी ओळख म्हणजे, तो प्रसिद्ध बिझनेसमॅन हरीश अहुजा यांचा नातू आहे.
आनंदचे वषाकार्ठीचे उत्पन्न अब्जावधीच्या घरात आहे. सोनम आणि आनंद एकत्र मिळून वर्षाला सुमारे 3085 कोटी रुपये कमवतात. ज्यामुळे दोघेही बॉलिवूडमधील एक अतिशय यशस्वी आणि श्रीमंत जोडी मानली जाते.