घटस्फोट झाल्यानंतर आईचे कर्तव्य बजावण्यासाठी या 5 अभिनेत्र्यांनी आपले करियर सोडले आणि लग्नही केले नाही..!

घटस्फोट झाल्यानंतर आईचे कर्तव्य बजावण्यासाठी या 5 अभिनेत्र्यांनी आपले करियर सोडले आणि लग्नही केले नाही..!

म्हटलं तर लग्न म्हणजे सात जन्मांचं नातं असत. परंतु कधीकधी विवाहित जीवनात असे काहीतरी घडते की हे नाते एका जन्मातच पूर्ण होते. ज्यामुळे पती-पत्नी घटस्फोटाने एकमेकांपासून वेगळे होतात. यानंतर बर्‍याच वेळा दोघेही दुसरे लग्न करतात.

त्यात काही लग्नाशिवाय एकटे राहतात. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी पतीपासून विभक्त झाल्यानंतर पुन्हा लग्न केले नाही आणि आपल्या मुलांसमवेत राहात आहेत. अशाच पाच बॉलिवूड अभिनेत्रींबद्दल आज आपण बोलणार आहोत.

करिश्मा कपूर
कपूर परिवाराची मोठी मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरने 2003 मध्ये संजय कपूरशी लग्न केले. संजय आणि करिश्मा यांना दोन मुले, अधरा आणि कियन राज कपूर आहेत. लग्नाच्या 13 वर्षानंतर अचानक दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. करिश्मापासून विभक्त झाल्यानंतर संजयचे पुन्हा लग्न केले पण करिश्मा आजही एकटी आहे. आता करिश्मा आपल्या मुलांसमवेत आनंदाने राहत आहे.

अमृता सिंग
प्रत्येकाला अमृता सिंगबद्दल माहिती आहे. 1991 मध्ये
अमृता सिंगने अभिनेता सैफ अली खानशी लग्न केले. लग्नाच्या 13 वर्षानंतर सैफ आणि अमृता यांनी परस्पर संमतीने आपले संबंध संपवले. सैफ आणि अमृता यांना सारा अली खान आणि इब्राहिम अली खान अशी दोन मुले आहेत. अमृतापासून विभक्त झाल्यानंतर सैफने 2012 मध्ये अभिनेत्री करीना कपूरशी लग्न केले होते. पण अमृता आपले दोन मुलांचे संगोपन करण्यासाठी आयुष्य व्यतीत करत आहे.

रीना दत्त
आमिर खानने 1986 साली रीना दत्तशी लग्न केले. रीना आणि आमिर यांनाही दोन मुले आहेत. लग्नाच्या बर्‍याच वर्षानंतर आमिरने 2002 मध्ये रीनाशी घटस्फोट घेतला आणि 2005 मध्ये किरण रावशी लग्न केले. पण रीनाचे आजपर्यंत दुसरे लग्न झाले नाही. रीना आपल्या दोन्ही मुलांसमवेत एकटी राहत आहे. पण आमिर आणि रीना आजही मित्र आहेत.

कोंकणा सेन
अभिनेत्री कोंकणा सेन शर्माने 2010 मध्ये अभिनेता रणवीर शोरेशी लग्न केले होते. कोंकणा लग्नापूर्वीच आई होणार होती. या बातमीनंतर दोघांनी लग्न केले. लग्नाला 5 वर्षानंतर दोघांनीही एकमेकांना घटस्फोट दिला. कोंकणा देखील सध्या आपल्या मुलाबरोबर एकटी राहत आहे.

चित्रांगदा सिंग
बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री चित्रांगदा सिंहने 2001 मध्ये ज्योती रंधावाशी लग्न केले. लग्नानंतर चित्रांगदा सिंह देखील एका मुलाची आई बनली. मुलगा जन्मल्यानंतर चित्रांगदा आणि पती ज्योती रंधावा एकमेकांपासून विभक्त झाले. घटस्फोटाच्या वेळी मुलाचा ताबा चित्रांगदा सिंग यांच्या ताब्यात देण्यात आला होता, त्यानंतर चित्रांगदा आता आपल्या मुलाबरोबर लग्न न करता आयुष्य जगत आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.