चालू शिक्षण सोडून केवळ ५०० रुपये घेऊन ऑडिशनसाठी मुंबईत आली होती ‘ही’ अभिनेत्री, आज राहतेय 50 करोडोच्या बंगल्यात..

चालू शिक्षण सोडून केवळ ५०० रुपये घेऊन ऑडिशनसाठी मुंबईत आली होती ‘ही’ अभिनेत्री, आज राहतेय 50 करोडोच्या बंगल्यात..

आज आपण अशा एका अभिनेत्रबद्दल बोलणार आहोत जी केवळ ५०० रुपये घेऊन मुंबईमध्ये आली होती. यासाठी तिने आपले शिक्षण सुद्धा अर्धवट सोडले पण आज ती नामांकित अभिनेत्रींपैकी एक आहे. एका नव्या शहरात वास्तव्यास येणे हे एका तरुण मुलींसाठी खूपच अवगड आणि आवहनात्मक असते.

पण तिने स्वत: ला स्थापित करण्यासाठी आणि आपली ओळख निर्माण करण्यासाठी खुपच धडपड केली. एका मुलाखतीत तिने सांगितले की, अगदी माझ्याकडे एक रुपया सुद्धा खिशात नसताना मी दररोज ३० किलोमीटर ऑडिशनला जात होते. परंतु ही ऑडिशन बहुधा टीव्ही जाहिरातींसाठी असायची आणि यावेळी तिच्यावर खूप दबाव सुद्धा असायचा की जर काम मिळाले नाही तर घरभाडे कोण देणार.

तिने शाळेत असताना अनेक नाटकांमध्ये काम केले होते आणि तिला या नाटकांसाठी अनेक पारितोषिके मिळाली होती. तेव्हा पासून तिचे बॉलीवूडमध्ये येण्याचे स्वप्न होते. दिशा लहानपणापासूनच खूप हुशार व चलाख होती आणि आज ती एक इलेक्ट्रिक इंजिनियर आहे, आणि अशीच एकदा दिशा आपल्या स्वप्नांच्या मागे फक्त ५०० रुपये घेऊन मुंबईत आली. ज्यासाठी तिच्या घरच्यांचा खूपच विरोध होता पण तरीही ती कोणाचे सुद्धा ऐकणारी नव्हती.

एका कार्यक्रमात बोलताना ती म्हणाली की मीं कोणालाही न सांगता फक्त 500 रुपये घेऊन मुंबईत आले होते आणि त्यावेळी आपण आपल्या कुटुंबाची देखील मदत मागितली नाही. थोडे दिवस मूंबईत राहून मग मीं येथे मॉडेलिंग सुरू केले आणि मॉडेलिंगमध्ये आपला हात बसल्यानंतर हळूहळू अभिनयाच्या दुनियेत तिने पाऊल टाकले. आणि तिने आपल्या फिल्मी करियरची सुरवात एका तेलगू चित्रपटांतून केली.

आज ती बॉलिवूडची एक सर्वात मोठी स्टार बनली आहे. आपल्याला सांगू इच्छितो की दिशा पटानी आता वांद्रे, मुंबई येथील एका आलिशान घरामध्ये राहते. तिच्या घराची किंमत सुमारे ५० कोटी रुपये इतकी आहे. ती आज एक बॉलिवूडमधील सर्वांत सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले आहेत ज्यामध्ये बागी,एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी, मलंग या चित्रपटाचा समावेश आहे.

तिचा एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी हा चित्रपट खूपच गाजला होता आणि तेव्हापासूनच ती प्रकाश झोतात आली. तेव्हा पासून तिची यशाची गाडी कोठे थांबली नाही त्या नंतर तिला अनेक चित्रपट मिळत गेले. ती लवकरच आता सलमान खानसोबत ”राधे” या चित्रपटात दिसणार आहे. तिचा साठी चित्रपट खूपच यादगार असणार आहे कारण या चित्रपटात ती सलमान सोबत दिसणार आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.