चित्रपटात रेल्वे स्टेशन मधील सिन शूट करण्यासाठी निर्मात्यांना मोजावी लागते एवढी मोठी रक्कम, आकडा वाचून चकित व्हाल…

बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत जे विना रेल्वे स्टेशन पूर्ण होऊच शकत नाही असे अनेक चित्रपट आहेत ज्याचे नाव देखील रेल्वे वरून ठेवण्यात आले आहे. जस कि चेन्नई एक्सप्रेस, हा चित्रपट सुरु होताना रेल्वे स्टेशन पासून होतो आणि रेल्वे स्टेशन जवळच संपतो.
‘जा सिमरन जा’ हा आयकॉनीक सिन असणारा ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ते ‘दिल से’ चित्रपटातील ‘चल छैया छैया’ हे सुपरहीट गाणं ते आताचे ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘बजरंगी भाईजान’ सारख्या अनेक चित्रपटांसाठी रेल्वेचा वापर करण्यात आला आहे.
जसे की चित्रपटाचे चित्रिकरण रेल्वे किंवा रेल्वे स्थानकाच्या आवारात होत असेल, तर A आणि A1 श्रेणीतील स्थानकांसाठी एका दिवसासाठी 1 लाख रुपये मोजावे लागतात. तर B1 आणि B श्रेणीतील स्थानकांना दररोज 50 हजार रुपये द्यावे लागतात. याशिवाय रेल्वेच्या व्यस्त कामकाजात चित्रिकरण करायचे असेल तर 15% अतिरिक्त शुल्क भरावे लागते.
अॅपमधील चित्रे पहा आणि 80% डेटा वाचवा
भारतीय रेल्वेने रेवाडी स्टीम लोको शेडचा वापर केला आहे, यामुळे ती एक वारसा म्हणून ठेवली गेली आहे. एखाद्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी इंजिन आणि 4 डब्यांची मागणी असेल तर रेल्वे एका दिवसासाठी सुमारे ५० लाख रुपये शुल्क आकारते. चित्रपटाच्या शूटिंगसाठी 200 किमी आणि 5 वॅगनसाठी दररोज किमान 4,26,600 रुपये इतक शुल्क आकारलं जातं.
अनेक चित्रपटांसाठी रेल्वेचा वापर आवश्यक असतो. अनेकदा सेटही उभारले जातात. पण प्रत्येकवेळी सेट उभारण शक्य नसल्याने खरी खुरी रेल्वे आणि रेल्वे स्थानक दाखवलं जातं.