“जानवर” चित्रपटातील अक्षय कुमार सोबतचा ‘हा’ गोंडस मुलगा आठवतोय का, पहा आता दिसतोय असा…

“जानवर” चित्रपटातील अक्षय कुमार सोबतचा ‘हा’ गोंडस मुलगा आठवतोय का, पहा आता दिसतोय असा…

आजवर बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार झालेले आहेत की ज्यांनी लहानपणापासूनच चित्रपटात काम करून आपली कारकीर्द गाजविली आहे. यामध्ये सचिन पिळगावकर यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. सचिन पिळगावकर यांची एकूणच कारकीर्द ही जवळपास पन्नास वर्षाची आहे. त्यांनी लहानपणापासून अनेक चित्रपटात काम केले होते. आफताब शिवदासानी, उर्मिला मार्तोंडकर हे देखील याचे उदाहरण म्हणावे लागेल.

उर्मिला मार्तोंडकर हिनेदेखील बालकलाकार म्हणून आपली भूमिका बजावली होती. आज उर्मिला मार्तोंडकर जरी चित्रपटात काम करत नसली तरी ती टॉपची अभिनेत्री म्हणून गणल्या जाते.याप्रमाणेच शाहरुख खानचा कुछ कुछ या चित्रपटातील छोट्या मुलीचा रोल केलेली मुलगी देखील आता मोठी अभिनेत्री झालेली आहे. तसेच अशा छोट्या अभिनेत्र्या मोठ्या झालेल्या आहेत. शाहिद कपूर याने देखील लहान वयातच बॉलिवूडमध्ये काम करायला सुरुवात केली होती.

मात्र, यातील गंमत म्हणजे काही जणांना यातून यश मिळाल्याची पाहायला मिळते, तर काही जणांना अपयश आल्याचे दिसते. अक्षय कुमार हा देखील असाच एक कलाकार आहे. त्याने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अक्षय कुमारने त्याच्या चित्रपटांची सुरुवात खिलाडी या चित्रपटातून केली. खिलाडी हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटात अतिशय रहस्यमय कथा होती.

ट्विंकल खन्ना सोबत लग्न झाल्यानंतर त्याची कारकीर्द खऱ्या अर्थाने सुरू झाली, असे म्हणावे लागेल. आम्ही आपल्याला अक्षय कुमारच्या आज एका अशा चित्रपटाबद्दल सांगणार आहोत की हा चित्रपट त्यावेळी गाजला होता. अक्षय कुमारने 1999 मध्ये जानवर हा चित्रपट केला होता. हा चित्रपट त्यावेळेस प्रचंड गाजला होता. या चित्रपटातील गाणीही सुमधुर होती. या चित्रपटातील गाण्यांना आनंद मिलिंद यांनी संगीत दिले होते.

तर या चित्रपटाचे दिग्दर्शन सुनील दर्शन यांनी केले होते. या चित्रपटात अक्षय कुमार सोबत करिष्मा कपूर, शिल्पा शेट्टी, मोहनीश बहल, आशुतोष राणा, अशिष विद्यार्थी, जॉनी लिव्हर, कादर खान यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. या सर्वांच्या भूमिकांनी हा चित्रपट सजला होता. मात्र, या चित्रपटात अक्षय कुमार याने चांगला भाव खाल्ला होता.

अक्षय कुमार सोबत या चित्रपटात एका छोट्या गोंडस मुलाने हा चित्रपट गाजवला होता. या चित्रपटात त्या मुलाचे नाव राजू असे होते. आता हा राजू काय करतो, काय नाही, याबद्दल आपल्याला उत्सुकता लागली असेल. राजू सध्या चित्रपटसृष्टीमध्ये येण्यासाठी उत्सुक आहे. या राजूचे खरे नाव आहे आदित्य कपाडिया असे आहे.


जानवर चित्रपटामध्ये आदित्य हा अतिशय गोंडस आणि लोभस असा दिसत होता. अक्षय कुमारसोबत त्याची ट्यूनिंग चांगली जमली होती. आता आदित्य कपाडिया हा अतिशय स्मार्ट दिसत आहे. सध्या तो बॉलीवूडमध्ये येण्यास तयार आहे. मात्र, सध्या कोरोना मुळे त्याच्याकडे कुठलेही नवे काम नाही. मात्र, नवीन चित्रपटात काम करून आपण लवकरच आपली कारकीर्द सुरू करू, असे त्याने सांगितले आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *