ठरलं एकदाच ! कॅटरिना आणि विकी अडकणार लग्नबेडीत ! ‘या’ महिन्यात करणार लग्न..

ठरलं एकदाच ! कॅटरिना आणि विकी अडकणार लग्नबेडीत ! ‘या’ महिन्यात करणार लग्न..

बॉलीवूड सेलिब्रटी असेल आणि सिंगल असेल तर, कोणत्या इतर सेलेब्रिटींसोबत त्यांच्या नावाची चर्चा नाही झाली तरच नवल. अनेकवेळा दोन सेलिब्रिटीजमध्ये मैत्रीच्या पलीकडे काहीही नसते, मात्र त्या नात्याला देखील मीडिया आणि गॉसिप मॅगझीन स्वतःच्या फायद्यासाठी अफेअरचे रूप देतात. अनेक सेलेब्रिटीजच्या बाबतीत असं घडल्याचं आपण पाहिलं आहे.

विशेष म्हणजे, अशा बातम्यांमुळे यता सेलेब्रिटीजला देखील प्रसिद्धी मिळते, म्हणून तेदेखील अशा बातम्यांवर मौन असतात. मात्र, कधी कधी त्या बातम्यांमध्ये सत्य देखील असते. माघील बऱ्याच दिवसांपासून, कॅटरिना कैफ आणि विकी कौशलच्या नात्याची चर्चा सुरु होती. मात्र दोघांपैकी एकाने देखील याबद्दल कधीच उघडपणे खुलासा केला नव्हता.

बॉलीवूड अभिनेत्रीचा आवडता डिझायनर, सब्यसाची माघील काही दिवसांपासून कॅटरिनाच्या लग्नाच्या ड्रेसच्या तैयारीत असल्याचं सांगितलं जात आहे. कॅटरिना कैफला, पारंपरिक पोशाख रेशमच्या कपड्यात आवडतात, आणि तिच्या आवडीच्या इतर काही सामानाची लगबग सब्यसाचीच्या कलकत्त्याच्या शोरूम बाहेर बघायला मिळत असल्याचे देखील सांगितले जात आहे. सब्यसाची एक सर्वात उत्तम डिझायनर आहे.

खास करून, लग्नाचे कपडे तो सगळ्यात उत्तम डिझाईन करतो असं सगळ्यांना माहित आहे. त्याचे कपडे पारंपरिक लाल रंगाचे असले तरीही त्यामध्ये विविधता असते आणि त्यामुळेच तो आज जगभरातील एक उत्तम डिझायनर म्हणून ओळखला जातो. प्रियांका चोप्राच्या लग्नाकडे संपूर्ण जगाचे लक्ष होते. तिने, परिधान केलेला पूर्ण भारतीय पोशाख, सब्यसाचीनेच डिझाईन केला होता. तिच्या लग्नामध्ये ती एखाद्या परीसारखीच दिसत होती त्याचे सगळे श्रेय ती सब्यसाचीलाच देते.

दीपिका पदुकोणने देखील सब्यसाचीने डिझाईन केलेले कपडे आपल्या लग्नाच्या सर्व, कार्यक्रमांमध्ये आणि रिसेप्शनमध्ये घातले होते. ती त्यामध्ये एखाद्या स्वप्नसुंदरी सारखीच दिसत होती. अनुष्का शर्माने तिच्या लग्नात घातलेला लेहंगा आजदेखील अनेक मुलीचा आवडता आहे. तो लेहंगा देखील सब्यसाचीनेच डिझाईन केला होता. त्यामुळे आता, कॅटरिनासाठी सब्यसाची कोणत्या प्रकारचा पोशाख बनवणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.