तब्बल 13 वर्षाने रिलीज होत आहे कपिल शर्माची डेब्यु फिल्म, पहा आज दोन मुलांची आई बनली आहे ‘या’ चित्रपटातील नायिका…

चित्रपट तयार होण्यासाठी जास्तीत जास्त एक किंवा दीड वर्ष किंवा अधिक एखाद्या वर्षापेक्षा जास्त कालावधी लागतो. पण बॉलिवूडमध्ये एक चित्रपट असाही आहे ज्याला रिलीज होण्यास एक वर्षं नाही 2 वर्ष नाही तर 13 वर्षे लागली आहे. बरीच प्रतीक्षा केल्यानंतर बोनी कपूरच्या ‘इट्स माय लाइफ’ चित्रपटाला अखेर रिलीजची तारीख मिळाली.
हा चित्रपट 29 नोव्हेंबर रोजी कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर किंवा थिएटरवर नव्हे तर थेट टीव्ही चॅनल झी सिनेमावर रिलीज होईल. या 13 वर्षांत चित्रपटाच्या मुख्य कलाकारांचे आयुष्य खूपच बदलले गेले आहे. उदाहरणार्थ, चित्रपटाची नायिका जेनेलिया डिसोझाने लग्न केले आहे आणि 2 मुलांची आई बनली आहे, अभिनेता हरमन बावेजाने जवळजवळ अभिनयातून संन्यासघेतला आहे.
कॉमेडियन कपिल शर्माचा पहिला चित्रपट :-
13 वर्षांपूर्वी जेव्हा स्टँड अप कॉमेडियन कपिल शर्माने ‘ग्रेट इंडिया लाफ्टर चॅलेंज’ चा तिसरा सीझन जिंकला होता, तेव्हा त्यांना एका चित्रपटात काम करण्याची संधीही मिळाली होती. त्यानंतर कपिल या चित्रपटाच्या शुटिंगचे किस्से आपल्या मित्रांना सांगत असे, परंतु हा चित्रपट कधीच प्रदर्शित झाला नाही. पण आता तो रिलीज होत आहे.
निर्माता बोनी कपूर यांनी 2006 मध्ये रिलीज झालेल्या सिद्धार्थ, प्रकाश राज आणि जयसुधा स्टारर फिल्म ‘बोम्मारिलू’ या हिंदी रिमेक हक्कांची खरेदी केली आणि प्रसिद्ध लेखक अनीस बज्मी यांना लेखक म्हणून घेऊन हिंदीमध्ये बनवले.
चित्रपटात हरमन बावेजाच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणारे नाना पाटेकरसुद्धा मी टू च्या वादांकीत मुद्यांत अडकल्यानंतर त्यांनी देखील अभिनय सोडून दिला आहे. अनीस बज्मी दिग्दर्शित हा चित्रपट बोनी कपूर निर्मित तेलुगु फिल्म ‘बोममारिलू’ चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात हर्मान बावेजा, जेनेलिया डिसूझा, नाना पाटेकर यांच्याशिवाय कॉमेडियन कपिल शर्माचीही छोटी भूमिका आहे.