3 हजार रूपयांसाठी हॉटेलमध्ये काम करायची, पहा आज आहे बॉलिवूडची प्रसिद्ध आणि गलमर्स अभिनेत्री…

3 हजार रूपयांसाठी हॉटेलमध्ये काम करायची, पहा आज आहे बॉलिवूडची प्रसिद्ध आणि गलमर्स अभिनेत्री…

बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी देशभरातून अनेक तरुण-तरुणी येत असतात. त्याचप्रमाणे परदेशातून देखील मुंबईमध्ये लोक दाखल होत असतात. मात्र, प्रत्येकालाच यश मिळेल की नाही हे सांगता येत नाही. ज्या तरुणांमध्ये टॅलेंट भरलेले असते, असे तरुण हे पुढे जाऊन यशस्वी होतात. बॉलिवूडमध्ये असे खूप उदाहरणे आहेत.

उदाहरण द्यायचे झाले तर आपण नवाजुद्दीन सिद्दिकी याचे घेता येईल. नवाजुद्दीन सिद्दिकी याने बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी खूप स्ट्रगल केलेले आहे. सुरुवातीच्या काळात छोट्या-मोठ्या भूमिका त्यांनी केल्या होत्या. आज तो बॉलिवूडचा सर्वाधिक मागणी असणारा कलाकार आहे. त्याचप्रमाणे अक्षय कुमार याचे देखील आहे.

अक्षय कुमार हा सुरुवातीच्या काळामध्ये आचारी होता. त्यानंतर त्याला चित्रपटांमध्ये संधी मिळावी आणि त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. आज तो बॉलीवूडचा आघाडीचा कलाकार बनला आहे. शाहरुख खान याचे देखील असेच आहे. शाहरुख खान याने देखील सुरुवातीला छोट्या पडद्यावर सर्कस ही मालिका साकारली होती.

सर्कस या मालिकेतील त्याची भूमिका सगळ्यांना खूप आवडली होती. त्यानंतर त्याने चित्रपटात एंट्री केली. शाहरुख खान आज आघाडीचा सुपरस्टार म्हणून गणल्या जातो. आज आम्ही आपल्याला एका अशा अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत की, जिने बॉलिवूडमध्ये करिअर करण्याच्या पहिले एका हॉटेलमध्ये काम केले होते आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल.

मात्र, हे खरे आहे. या अभिनेत्रीचे नाव सोनल सहगल असे आहे. सोनल हिने अनेक मालिकामध्ये देखील काम केलेले आहे. मात्र, सोनम हिला खऱ्या अर्थाने जस्सी जैसी कोई नही या मालिकेत ओळख मिळाली. या मालिकेत तिने खलनायकी भूमिका केली होती. त्यानंतर तिला काही स्थानिक जाहिराती देखील मिळाल्या. या माध्यमातून ती आपला चरितार्थ चालवत होती.

त्यानंतर तिला कसोटी जिंदगी की ही मालिका मिळाली. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. त्यानंतर तिने हॉटेल किंग्स्टन या मालिकेत काम केले होते. तिने 2005 मध्ये चित्रपटातून देखील पदार्पण केले. यु अँड मी या चित्रपटात तिला भूमिका मिळाली होती. मात्र, हा चित्रपट जेमतेमच चालला होता.

मात्र, तिला खऱ्या अर्थाने आमिर खान याचा गजनी या चित्रपटात ओळख मिळाली. गजनी या चित्रपटात तिची एक छोटी भूमिका होती. मात्र, ती दमदार होती. बॉलिवूडमध्ये काम करण्याच्या एका हॉटेलमध्ये काम केले होते. या हॉटेलमध्ये तीन हजार रुपये महिना मिळायचा, अशी माहिती समोर आली आहे. आपल्याला सोनल आवडते का हे आम्हाला नक्की सांगा.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *