‘तुमसे अच्छा कौन है’ मधील रातोरात प्रसिद्ध झालेला ‘हा’ कलाकार बॉलीवुड मधून अचानक झाला गायप, पहा आता करतोय हे काम…

बॉलीवुड असे क्षेत्र आहेत की तिथे कधीही कोणीही अगदी वेगाने प्रसिद्ध होते आणि त्यानंतर त्याच वेगाने ते प्रसिद्ध झालेले कलाकार त्याच वेगाने नजरेआड देखील होतात. रातोरात प्रसिद्ध होणारे कलाकार देखील सर्वांच्या पाहण्यात आलेले आहेत. परंतु तेच कलाकार आज बॉलीवुड मध्ये दिसणे देखील मुश्किल झाले आहे. कधी कधी याच प्रसिद्ध कलाकारांना चाहते देखील विसरून जातात.
आज आपण अश्याच एका कलाकारा बद्धल माहिती करून घेणार आहोत. जो रातोरात प्रसिद्ध झाला होता. परंतु प्रसिध्दी नंतर त्याला कोणतेही काम मिळाले नसल्याने त्याने बॉलीवूडला रामराम ठोकला आणि बॉलीवुड पासून खूप दूर निघून गेला. चाहते देखील या कलाकाराला आता पुरते विसरले आहेत. हाच कलाकार ज्याचे बद्धल अनेक अफवा देखील पसरवल्या गेल्या होत्या.
‘तुमसे अच्छा कौन है’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये लोकप्रिय झालेला नकुल कपूर आज आपल्या चाहत्यांना जवळजवळ विसरलाच आहे. पण एक काळ असा होता की या अभिनेत्याने आपल्या अभिनयाने मुलींच्या मनावर राज्य केले होते. पहिल्या चित्रपटानंतर मुली चॉकलेट बॉय नकुलाच्या प्रेमात वेड्या झाल्या होत्या.
नकुलने 1998 मध्ये ‘हो गयी है मोहब्बत तुमसे’ या अल्बमने आपल्या करिअरची सुरूवात केली होती. यानंतर 2001 साली त्याने ‘आजा मेरे यार’ चित्रपटात काम केले पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट काही खास जादू दाखवू शकला नाही. यानंतर नकुलाला 2002 साली ‘तुमसे अछा कौन है’ हा चित्रपट मिळाला. या चित्रपटात नकुल ने उत्कृष्ट कामगिरी केलेली असल्याने नकुल च्या कामगिरीला चाहत्यांची पण तशीच चांगली प्रतिक्रिया मिळाली होती. रातोरात नकुल प्रसिद्ध झाला होता.
या चित्रपटा नंतर त्याचे चाहते देशभरातून पाहायला मिळाले होते. यावेळी त्याने बर्याच पैशांची कमाई देखील केली पण हे स्टारडम त्याला असाच टिकवता आला नाही. या चित्रपटाची गाणी सुपरहिट झाली होती. त्यावेळी प्रत्येकाचे ओठावर ते गाणे असायचे. पण या चित्रपटा नंतर नकुलला इतर अधिक चित्रपटांकडून विशेष ऑफर मिळाल्या नाहीत.
2005 साली त्याने टर्मिनल सिटी या टीव्ही च्या मालिकेत काम केले. बराच काळ काम नसल्यामुळे त्याने बॉलिवूडपासून दूर जाण्याचे ठरवले. त्यानंतर नकुल कपूर याला कोणतेही काम मिळाले नाही. जेव्हा नकुल कपूरबद्दल कोणतीही बातमी येत नव्हती तेव्हा चाहत्यांनी इंटरनेटवर त्याचा शोध सुरू केला. तो जि*वंत आहे की नाही हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे होते.
त्याच्या मृ*त्यूच्या अ*फवा बर्याचदा उठल्या पण तसे काही झालेले नव्हते. बॉलीवुड सोडून नकुल आजकाल कॅनडामध्ये आहे आणि योग प्रशिक्षक म्हणून नकुल तिथे काम करत आहे. योग प्रशिक्षक म्हणून काम करणारा नकुल खूप आनंदी आहे. रिपोर्ट्सनुसार, नकुल कपूर यांचे स्वप्न होते की लोकांना योग शिकवायचे. आज तो या कामाचा पाठपुरावा करीत आहे.