तैमुरचा संभाळ करणाऱ्या ‘आया’चा पगार बघूनच तुम्ही आश्चर्यचकित व्हाल…!

स्टार-कीड असूनही अनेकांना प्रसिद्ध होण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. परंतु ज्यांच्यामध्ये प्रतिभा असते ते नक्कीच आपल्या जोरावर प्रसिद्ध होतात. आणि स्टार-कीड असल्याची परंपरा पुढे चालू ठेवतात. आणि यासाठी करिना कपूर खानपेक्षा दुसरे उदाहरण असूच शकत नाही. करीनाने आपल्या चित्तथरारक कामगिरीद्वारे आपल्या चाहत्यांच्या हृदयावर आणि समीक्षकांच्या मनावर आपली छाप पाडली आहे.
तिचा अपवादात्मक स्क्रीन टाइमिंग, चमकदार डायलॉग डिलिव्हरी आणि किलर डान्स मूव्ह्समुळे करीना फार पूर्वीच प्रसिद्ध झाली आहे. ती फक्त एक स्टार-किड नाही. तर प्रसिद्ध कपूर खानदानची असून, जेव्हापासून तिने चित्रपट श्रुष्टीत पदार्पण केले तेव्हापासून ती आपली मने जिंकत आली आहे. पण या सर्व गोष्टींना अपवाद आहे ते सैफ अली खान आणि करीना चा मुलगा तैमुर.
ज्या आईवडिलांना आपल्या लहान मुलांना सांभाळण्यासाठी वेळ नसतो ते आया म्हणून बाईला कामाला ठेवतात. त्यात सेलिब्रिटींच्या घरी त्यांचे लहान मुलं सांभाळण्यासाठी आया असते. तशीच आया तैमुरला सांभाळण्यासाठी सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी कामाला ठेवली आहे जी सतत तैमुरसोबत असते. पण या आयाला किती पगार मिळतो तुम्हाला माहिती आहे का? नाही ना मग जाणून घेऊया..!

तैमुर आपला जास्तीत जास्त वेळ त्या आयाबरोबर घालवत असरी आणि सहसा बाहेर जाण्याच्या वेळी तिच्याबरोबर असतो. त्या आयासोबत तैमुरचा फोटो क्लिक झाल्यामुळे तैमुरला सांभाळण्याऱ्या त्या आयाच्या पगाराची चर्चा सद्या सोशल मीडियावर होत आहे. कारण तैमुर जास्त वेळ त्याच्या आईवडिलपेक्षा या आयासोबतच घालवतो.
तैमुरचा सांभाळ करणाऱ्या या आयाचे नाव सविती असून तिला दरमहा दीड लाख रुपये इतके वेतन मिळते, आणि जर त्या आयाने जास्त वेळ तैमुर सोबत घालवला तर तासाचा हिशोबाने तिला ओव्हर टाइम देखील मिळतो. आणि तिची स्वतःची कार देखील आहे. ओव्हर टाइम करून तिला 1.7 लाख इतका दरमहा पगार मिळतो. खुद्द करीना कपूरने या बातमीला दुजोरा दिला आहे.