धान्याची पोती उचलली, श’रीरावरील ज’खमांमुळे वडिलांना जमीन विकायला लावली, पण आज ‘IPL’मध्ये कमवतोय नाव..

धान्याची पोती उचलली, श’रीरावरील ज’खमांमुळे वडिलांना जमीन विकायला लावली, पण आज ‘IPL’मध्ये कमवतोय नाव..

आपल्या देशामध्ये क्रिकेटचे चांगलेच वेड आहे. त्यादृष्टीने भारतातील दहापैकी कमीत कमी सात जण तरी एक उत्तम क्रिकेटपटू बनायचे स्वप्न बघतात. यामध्ये केवळ काहीच जण यशस्वी होतात. या यशस्वी होणाऱ्या क्रिकेटपटूंचा संघर्ष देखील अभूतपूर्व ठरलेला, आपण पाहिला आहे. अनेक क्रिकेटपटू अगदी सर्वसामान्य कुटुंबात आपले सामान्य आयुष्य जगत होते.

मात्र आपल्या कौशल्य, मेहनत आणि हटके शैली या बळावर ती त्यांनी आज संपूर्ण जगात आपले नाव कमावले आहे. आपल्या देशातील जवळपास सर्वच क्रिकेटपटूंची संघर्ष यात्रा अशीच बघायला मिळते. आत्ता सध्या आयपीएल मध्ये एका क्रिकेटपटूची चांगलीच चर्चा रंगलेली बघायला मिळत आहे त्याच नाव आहे ‘कार्तिक त्यागी’.

कार्तिकचे कुटुंब शेतकऱ्यांचे; त्यामुळे शेतीची सर्व कामे कार्तिकला येतात. पिकवलेल्या धान्याची पोती बस आणि ट्रॅक्टर मध्ये भरून, बाजार पर्यंत पोहोचवण्याच्या कामात तर कार्तिक अगदी तरबेज होता. मात्र त्याचे क्रिकेट बद्दलचे प्रेम हे त्याला आणि त्याच्या घरच्यांनाही ठाऊक होतेच. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याला क्रिकेटर बनण्यासाठी कायमच सपोर्ट केला.

कारकीर्दीच्या सुरुवातीलाच, कार्तिकला एक जखम झाली होती. त्यावेळी त्याच्या उपचाराकरिता त्याच्या वडिलांनी चक्क काही शेत जमीन विकली होती. दिल्लीतील डॉक्टरांनी दोन महिन्यात त्याची जखम बरी होईल असं सांगितले होते. मात्र तरीही ज’खम बरी होतच नव्हती. अखेरीस त्याने बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी मध्ये दाखला घेतला.

मात्र तेथे स्वतः सर्व खर्च करावा लागणार होता. त्यावेळी त्याच्या वडिलांनी आपली शेतजमीन विकली. तेव्हा त्याच्या वडिलांनी घेतलेल्या कष्टांचे आज कार्तिकने चीज करून दाखवले आहे. अखेरच्या षटकात सहा गुण कमी धावांचे यशस्वी संरक्षण करणारा कार्तिक त्यागी हा जगातील दुसरा गोलंदाज ठरला आहे.

इंग्लंडचा अष्टपैलू स्ट्रोक्स, ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम गोलंदाज ब्रेट ली यांच्याकडून कार्तिकचे भरभरून कौतुक करण्यात आले होते. बेन स्ट्रोक याने कार्तिकचे कौतुक करत, त्याला भविष्यातील ब्रेट ली असे देखील संबोधले होते. तो त्यांच्याप्रमाणेच रणअप घेतो आणि ईशांत शर्मा सारखा चेंडू टाकतो. त्यामुळे त्याची खेळी अजूनच जास्त उंचावते, असे स्ट्रोक म्हणाला होता.

ब्रेट लीनेदेखील त्याची गोलंदाजी बघून कौतुकाने त्याची पाठ थोपटली होती. 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेमध्ये अकरा बळी कार्तिकच्या नावे आहेत. 2020 साली, झालेल्या 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धा मध्ये कार्तिकने सहा सामन्यात 3.45 च्या सरासरीने अकरा गडी बाद केले होते. या स्पर्धेत तो भारताचा दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, आणि येथूनच कार्तिकला खरी ओळख मिळाली.

त्याच वर्षीच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सने लिलावात, या युवा गोलंदाजाला तब्बल 1 कोटी 30 लाख रुपये देत स्वतःकडे घेतले. संघर्षाने चारित्र्य उभारून पुढे येते हे कार्तिकीच्या बाबतीत अगदी सत्य ठरते. त्याच्या रूपाने भारताला एक उत्तम गोलंदाज मिळाला हे मात्र नक्की.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.