‘या’ व्यक्तीच्या प्रेमात ‘नोरा’ ? गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरील फोटो व्हायरल…

‘या’ व्यक्तीच्या प्रेमात ‘नोरा’ ? गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरील फोटो व्हायरल…

बॉलीवूडमध्ये आशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या आपल्या अभिनयासाठी नाही तर फिटनेस, सौंदर्य आणि डान्स साठी जास्त प्रसिद्ध आहेत. नोरा फतेही (Nora Fatehi) देखील अशाच काही अभिनेत्रींपैकी एक आहे. नोराने आपल्या डान्स आणि सौंदर्याने अनेकांना घायाळ केले आहे. तिने रोर या सिनेमाधुन बॉलीवूड मध्ये पदार्पण केले होते.

त्यानंतर साऊथच्या काही सिनेमामध्ये आपल्या डान्सने तिने अक्षरशः धुमाकूळ घातला. बाहुबली द बिगनिंग या जगप्रसिद्ध सिनेमामध्ये मनोहरी या आयटम सॉंगमध्ये देखील ती झळकली होती. त्यातच तिने बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतली. त्यानंतर लगेच तिने झलक दिख ला जा(jalak dikh la ja) या सेलेब्रिटी डान्स रियालिटी शोमध्ये देखील झळकली.

विशेष म्हणजे या फोटोज मुळे नोरा रिलेशनशिपमध्ये आहे की काय आशा चर्चा सुरु झाल्या आहेत. अलीकडे एका डान्स रियालिटी शोमध्ये नोराने, कोरियोग्राफर टेंरेन्स सोबत रोमँटिक डान्स केला होता. त्या दोघांचा हा डान्स बघून ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत की काय, या चर्चा सुरु होत्या. आता पुन्हा एकदा नोराच्या रिलेशनशिपबद्दल चर्चा सुरु झाला आहेत.

मात्र यावेळी तिच्यासोबत असणारा तरुण टेरेन्स नाही तर एक नावाजलेला गायक आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हुम्पलाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून नोराचे हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये नोरासोबत प्रसिद्ध गायक गुरु रंधावा (Guru Randhawa) दिसत आहे. या फोटोंनुसार, ते दोघेही गोव्याला असल्याचे सांगितले जात आहे.

एका सुंदर अशा बीचवर त्या दोघांचा हा फोटो क्लीक केला आहे. सुंदर बीच आणि सोबत नोरा आणि गुरु रंधावा दोघेही अगदी एखाद्या कपल प्रमाणे सोबत चालत आहेत. या फोटोंमध्ये त्यांना एकत्र पाहिल्यानंतर ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. बीचवर क्लिक केलेले नोरा आणि गुरु रांधवाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगेलच व्हायरल झाले आहेत.

दरम्यान हे दोघे एखाद्या म्युजिक व्हिडीओसाठी एकत्र आले आहेत की, खरोखर ते रिलेशनशिपमध्ये आहेत हे अद्याप समोर आले नाहीये. यापूर्वी नाच मेरी राणी या म्युझिक व्हिडीओमध्ये त्या दोघांनी एकत्र काम केले आहे. त्या दोघांचे हे गाणं चांगलेच हिट ठरले होते. प्रेक्षकांनी त्या गाण्याला भरभरून प्रतिसाद दिला होता. त्या गाण्यामधील त्यांची केमिस्ट्री बघून अनेकांना त्यांची जोडी खूप भावली होती.

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *