पतीपेक्षा ‘पत्नी’ वयाने लहान असणं का गरजेचं आहे? वाचा अप्रतिम लेख…

लग्नासाठी मुला-मुलींमधील वयात अंतर ठेवले जाते. बहुतांश घटनांमध्ये मुलगा मुलीपेक्षा मोठा असतो. अत्यंत क्वचित प्रसंगी मुलगी मुलापेक्षा मोठी असते. तथापि, हे समजून घेणे देखील आवश्यक आहे की मुलगा आणि मुलगी यांच्यातील वयात फरक का असावा?
प्रत्येक जण लग्न झाल्यावर प्रत्येक क्षणाचे फोटो हे सोशल मीडियावर शेअर करतो. तुम्हालाही सोशल मीडियावर फोटो शेअर करण्याची सवय असेल किंवा तुम्ही देखील लग्नाचे फोटो शेअर करणार असाल तर फोटो शेअर करण्यापूर्वी या सात गोष्टींचा विचार नक्की करा.
महिलांमध्ये होणारे हार्मोन्स बदल
महिलांमध्ये हार्मोन्स बदल लवकर होत असतात. पुरुषांमधील वृद्धत्वाची चिन्हे स्त्रियांच्या तुलनेत उशीरान दिसून येतात, तर स्त्रिया लवकर वयस्कर दिसतात, म्हणून त्यांचे वय कमी असणे ठीक आहे. परंतु या युक्तिवादाला कोणतेही बायोलॉजीकल कारण नाही. कारण बरेच पुरुष वेळेआधीच वृद्ध दिसू लागतात. पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त प्रतिरोधक असतात.
विचारात फरक
मुली मुलांपेक्षा लवकर मॅच्युअर होतात, असं म्हटलं जातं. पती-पत्नी दोघंही एकाच वयाचे असतील तर त्यांच्या विचार एकमेकांशी जुळणार नाहीत, ज्यामुळे त्यांच्यात सातत्याने भांडणं होत राहतील. त्यामुळे दोघांच्याही वयात अंतर असणं गरजेचं आहे.
घरातील आणि घराबाहेरील कामं
जर मुलगा मुलीपेक्षा वयाने मोठा असेल, तर तो घरातील छोटीछोट्या कामांमध्येही मदत करू शकेल. तर दुसरीकडे दोघांचंही एकच वय असेल तर अनुभवाअभावी त्यांच्या जीवनात खूप समस्या उद्भवू शकतात. घर आणि घराबाहेरील कामंही योग्यरितीने होण्यासाठी वयात अंतर असणं गरजेचं आहे.
मुली जास्त भावूक असतात
मुलांपेक्षा मुली जास्त भावूक असतात. त्यामुळे आपल्या मुलीला भावनिकरित्या आधार देईल, असा मुलगा शोधण्याचा प्रयत्न मुलीच्या पालकांचा असतो. जर त्याचं वय जास्त असेल तर तो मुलीला भावनिक आधार चांगल्याप्रकारे देऊ शकतो.