पतीशिवाय वयाच्या 48 व्या वर्षी ‘ही’ अभिनेत्री बनली एका मुलीची आई, पहा घरात आगोदरच 9 वर्षाचा मुलगा असून देखील….

पतीशिवाय वयाच्या 48 व्या वर्षी ‘ही’ अभिनेत्री बनली एका मुलीची आई, पहा घरात आगोदरच 9 वर्षाचा मुलगा असून देखील….

समाजात आपण नेहमीच पाहत आलो आहोत की प्रत्येक विवाहित जोडप्याला लग्नानंतर अपत्य प्राप्तीची ओढ लागलेली असते. त्यातच काही जोडप्यांची ही स्वप्न लवकर पूर्ण होतात तर काहींना हे सुख घेण्यासाठी उशीर देखील लागतो. बरेचसे असे जोडपे असतात की त्यांना पहिलं अ-पत्य झालं की दुसरं नको असत.

काही जोड्या अश्या देखील असतात की त्यांना दुसरं अ-पत्य देखील हवं असत. परंतु अशा काही जोड्या असतात की त्यांना मुलगा नाही तर मुलगी हवी असते. परंतु पहिल्या मुलाच्या जन्मानंतर दुसरें अपत्य जन्मास घालण्यास जेव्हा अश्या जोड्या नैसर्गिक रित्या असफल ठरतात तेव्हा त्यांच्यापुढे पेच निर्माण होतो.

मंदिरा बेदीला यापूर्वीच एक नऊ वर्षाचा मुलगा आहे. पण त्यांना एक मुलगी पण हवी होती. मुलीच्या प्रेमासाठी या जोडीने एक उत्तम पर्याय निवडला आहे. यामुळे मंदिराने गोंडस चिमुरडीला दत्तक घेतले आहे. मुलीला दत्तक घेऊन त्यांनी समाजात मुलींप्रती एक चांगला संदेश देखील पाठवला आहे. मंदिराने सांगितले की तिने आपल्या मुलीचे नाव तारा बेदी कौशल असे ठेवले आहे.

मंदिरा बेदी यांनी कुटुंबासह एक फोटो शेअर केला आहे. एका कवितेच्या माध्यमातून तीने सांगितले की तीने चार महिन्यांपूर्वीच तारा या मुलीला दत्तक घेतले होते. तीने लिहिले की, ‘ती आमच्याकडे येताने आशीर्वादाचे स्वरूपातच आली आहे. म्हणाली आमची छोटी मुलगी तारा. 4 वर्षे वयाची असून लुकलुकत्या ताऱ्याप्रमाणेच तिचे डोळे चमकत आहे. माझ्या वीर ची बहीण शोभून दिसते आहे. ‘

मंदिरा बेदी यांनी पुढे लिहिलं आहे की, ‘खुल्या हाताने आणि खऱ्या प्रेमाने तीचे आमच्या घरी स्वागत आहे. आम्ही खूप कृतज्ञ आणि धन्य आहेत. 28 जुलै 2020 रोजी तारा बेदी कौशल आमच्या कुटुंबाची एक भाग झाली. आणि आमच्या घरात नंदनवन बहरले आहेत. तारा घरात आलेपासून घर अगदी भरून गेल्यासारखे वाटत आहे. आम्ही मुलीला दत्तक घेतल्याने आता आमच एक मस्त कुटुंब तयार झालं आहे.

मंदिराचे पती राज कौशल यांनीही एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘दसऱ्याच्या निमित्ताने आम्ही आपणा सर्वांना आमच्या कुटूंबाचा एक नवीन सदस्य तारा बेदी कौशल हीची ओळख करून देत आहोत. अखेरीस आमचे कुटुंब पूर्ण झाले. हम दो और हमारे दो. ‘ अस म्हणत त्यांनी चाहत्यांना आनंदाने ही बातमी दिली आहेत. त्यांच्या या गोड बातमीला यूजर ने देखील चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.