पहिल्या प्रेमात धोका मिळताच वेळ वाया न जाऊ देता ‘या’ अभिनेत्रींनी केले दुसरे लग्न, लग्नानंतर असे बदलले नशीब…

पहिल्या प्रेमात धोका मिळताच वेळ वाया न जाऊ देता ‘या’ अभिनेत्रींनी केले दुसरे लग्न, लग्नानंतर असे बदलले नशीब…

बॉलिवूडबरोबरच टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्याच्या प्रेम प्रकरणाच्या बातम्या अनेक दिवस टीव्ही वर चालायच्या पण या अभिनेत्रीबद्दल सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे त्याच्या ब्रेकअपनंतरच पण त्यानंतर या अभिनेत्रींनी स्वत: ला चांगलेच सावरले आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला.

आता लग्नानंतर, या अभिनेत्री त्याच्या जीवन साथीदारासोबत एक सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत. चला तर मग जाणून घेऊया कि या अभिनेत्री कोण आहेत. ज्यांनी आपल्या ब्रेकअपनंतर लग्न करून अगदी आनंदाने संसार थाटला आहे.

रुबीना दिलाइक:- रुबीना दिलाइक आणि अविनाश सचदेवा यांच्या प्रेमकहाणी बद्दल सर्वांनाच माहित आहे. या दोघांची प्रेमकहाणी सतत चर्चेत होती. खरं तर अविनाशने रुबीनाचे जरी मन दुखावले असले तरी त्यानंतर रुबीनाने स्वतःला चांगलेच मूव ऑन केले आणि त्यानंतर मात्र तिच्या आयुष्यात अभिनव शुक्लाची एन्ट्री झाली आणि या दोघांनी वर्ष 2018 मध्ये लग्न केले आणि ते आज सुखी आयुष्य जगत आहेत.

काम्या पंजाबी:- टीव्ही जगातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट असलेली काम्या पंजाबी देखील आपल्या प्रेम प्रकरणांमुळे बराच काळ चर्चेत होती ती करण पटेल यांच्यासोबत अनेक दिवस रिलेशनशिपमध्ये होती, परंतु त्यांचे हे संबंध फार काळ टिकू शकले नाहीत आणि त्याचे काही कारणास्तव ब्रेकअप झाले.

परंतु काम्या आणि करणची जोडी त्याच्या चाहत्यांना खूप आवडली होती, त्यामुळे काम्याच्या या ब्रेकअपच्या वृत्तामुळे सर्वांनाच धक्का बसला होता. ज्यावेळी काम्याचे ब्रेकअप झाले त्यावेळी तिने स्वत: ला योग्यरीत्या हाताळले आणि गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात तिने शलभ डांगशी लग्न केले आणि ती आज एक सुखी वैवाहिक आयुष्य जगत आहे.

नेहा कक्कर:- नेहा कक्करने नुकतेच तिचा प्रियकर रोहनप्रीत सिंगसोबत लग्न केले आहे. नेहा कक्कर रोहनप्रीतशी लग्न करण्यापूर्वी हिमांश कोहली सोबत बराच काळ रिलेशनशिपमध्ये होती, पण या दोघांचे शेवटी ब्रेकअप झाले. त्याचे हे संबंध तुटले होते तेव्हा नेहाला खूप त्रास सहन करावा लागला होता आणि तिचे हे दुःख तिने अनेक वेळा थेट टेलिव्हिजनवर मांडले होते.

गौहर खान:- बिग बॉसमध्ये कुशल टंडनसोबत प्रेमसं’बंध असलेल्या गौहरचेही आता लग्न झाले आहे. गौहर आणि कुशल यांच्यातील रिलेशनशिप बद्दल बोलायचे झाले तर, जेव्हा ते बिग बॉसच्या घराबाहेर पडले तेव्हा त्याचे सं बंध देखील संपुष्टात आले. यानंतर, जैद दरबार गौहरच्या आयुष्यात आला आणि त्या दोघांनी काही दिवसांतच लग्न केले. आपणास सांगू इच्छितो कि गौहर आणि जैदचे डिसेंबर 2020 मध्ये लग्न झाले आहे.

दिव्यांका त्रिपाठी:- दिव्यांका आणि शरद हे टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वात नामांकित जोडपे असायचे, पण शरद मल्होत्राने दिव्यांकाचा विश्वासघा त केला आणि शेवटी हे एका चॅट शोमध्ये उघड झाले. पण त्याच्या या ब्रेकअपनंतर दिव्यंकाची प्रकृती खूप खालावली होती असे सांगितले जाते. तथापि, 2016 मध्ये दिव्यांकाचे विवेकबरोबर लग्न झाले आणि आता हे दोघेही खूप आनंदी आयुष्य जगत आहेत.

अनिता हसनंदानी:- अनीता हसनंदानी आणि एजाज खान यांची एकता कपूरची प्रसिद्ध मालिका ‘कविंजली’ दरम्यान भेट झाली. येथूनच या दोघांची लव्ह स्टोरी सुरू झाली, जी कित्येक वर्षे चालली. पण मीडिया रिपोर्टनुसार, अनिताने एजाजला रंगे हात पकडले आणि यानंतर मात्र त्याचा ब्रेकअप झाला आणि पुढे जाऊन अनिताने २०१३ मध्ये बिझनेसमन रोहित रेड्डीसोबत लग्न केले. आज रोहित आणि अनिता खूप आनंदी जीवन जगत आहेत.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *