प्रसिद्ध खलनायक अमरिश पुरी यांच्या मुलीचे सौंदर्य पाहून व्हाल चकित, आलिया आणि सारा पेक्षाही दिसते सुंदर

स्टार किड्स असल्यास बॉलीवूड मध्ये जाणे अगदी डाव्या हाताचा खेळ बनला आहे. अनन्या पांडे असो, की सारा अली खान असो किंवा शाहरूख चा मुलगा अब्राम, प्रत्येकाला कोणी ना कोणी लॉन्च करत असते. सैफ चा मुलगा तैमूर तर लहानपणीच सुपरस्टार झाला आहे.
पण असेही काही स्टार किड्स आहेत जे चित्रपटसृष्टी पासून चार हात लांब असूनही आरामात जीवन जगत आहे आणि चांगले कामही करत आहे. चित्रपट सृष्टी पासून चार हात दूर असलेली अमरीश पुरी यांची कन्या ‘नम्रता अमरीश पुरी’. अमरीश पुरी भलेही आज या जगामध्ये नसले तरी त्यांनी केलेला अभिनय प्रेक्षकांनी आपल्या मनात साठवून ठेवलेला आहे.
त्यांनी साकारलेले ‘ मोगॅम्बो’ अजूनही लोकांच्या डोक्यातून जात नाही. त्यांच्या या चित्रपटातून एक डायलॉग खूपच हिट झाला होता ‘मोगॅम्बो खुश हुआ’… अमरीश पुरी रहाणीमानाने अगदी साधारण होते. राहणीमान आणि इतर स्वभावाने अगदी सरळ होते. त्यामुळेच काय त्यांचा परिवार जास्त बॉलिवूड समोर येऊ नाही शकला.
बॉलीवूड मध्ये खूप नाव कमावणाऱ्या अमरीश पुरी यांचा परिवार मात्र ‘लाईमलाईट’ पासून दूर राहिला. अमरीश पुरी यांच्या परिवारात त्यांची पत्नी आणि दोन मुले आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. अमरीश पुरी यांच्या मुलीचं नाव ‘नम्रता’ आहे नम्रता बॉलीवूड पासून मात्र चार हात लांबच राहून आनंदाने जीवन जगत आहे.
नम्रता नावाप्रमाणेच नम्र आहे. नम्रता वडिलांप्रमाणेच आहे ‘साधे जीवन उच्च विचार’. नम्रता मालिकांपासून चित्रपटांपासून दूर असली तरी सोशल मीडियावर मात्र खूपच ॲक्टिव्ह असते. नम्रताने काही सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसते. नम्रताचे सोशल मीडियावर टाकलेले फोटो खूपच वेगाने व्हायरल झाले आहेत.
नम्रताचे चाहते तिला कमेंट द्वारे नेहमीच विचारत असतात की तू बॉलीवूडमध्ये कधी पदार्पण करणार आहे? आणि वडिलांसारखा सुंदर अभिनय कधी साकारणार आहे ? नम्रता मात्र या गोष्टीकडे दुर्लक्ष करते.
नम्रताने ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. तिने नुकतेच सॉफ्टवेअर इंजिनियर या क्षेत्रात मास्टर डिग्री घेतली आहे. त्यासोबतच ती एक ‘कॉस्च्युम डिझायनर’ देखील आहे. बिझनेस मॅन गिरीश भगत सोबत नम्रताचे लग्न देखील झालेले आहे. सोशल मीडियाद्वारे ती वेगवेगळ्या डिजाईन च्या कपड्या मध्ये फोटो शेअर करत असते. जर नम्रताने ही बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली तर वडिलांप्रमाणे तिलादेखील प्रसिद्धी मिळेल का?