प्रसिद्ध खलनायक गब्बर ची मुलगी चित्रपटात करणार पदार्पण, या अभिनेत्यासोबत देणार ली’पलॉक सिन….

बाॅलिवूडचे गब्बर अर्थात अमजद खान यांना आज कोण ओळखत नाही, त्यांच्या अभूतपूर्व अभिनयातून व केलेल्या कामातून त्यांनी रसिकप्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केल आहे. अमजद खान यांच्याबद्दल थोडीशी माहिती आपण एकदा पाहू. अमजद खान चित्रपटात येण्यापूर्वी एक थिएटर अभिनेते होते. नाझनीन या चित्रपटात त्यांनी त्यांची पहिली भूमिका केली होती.
त्यांची पुढची भूमिका वयाच्या अगदीच सतराव्या वर्षी “अब दिल्ली दुर नहीं” या चित्रपटातील होती. नंतर अमजद यांना शोले या चित्रपटासाठी डकैत गब्बरसिंग या भूमिकेची ऑफर सलीम खान यांनी दिली होती. या भूमिकेच्या तयारीसाठी अमजद यांनी तरुण कुमार भादुरी जे अभिनेत्री जया भादुरी यांचे वडील होते, यांनी लिहिलेल्या चंबळ डाकोवर अभिषेक चंबळ हे पुस्तक वाचले होते.
शोले या चित्रपटातील एकूण एक गोष्ट वैशिष्ट्यपूर्ण होती. खास बात अगदी जयवीरू च्या जोडीपासून ते बसंती, ठाकूर आणि महत्वाचा म्हणजे व्हिलन गब्बर सिंह. गब्बर सिंह यांची भुमिका बजावली ती अमजद खान या अभिनेत्याने. या नटाची कारकिर्द अगदी अद्भुत राहिली आहे.
महत्त्वाचं म्हणजे, अमजद खान यांना निम्मा भारत केवळ गब्बर सिंह याच नावाने लक्षात ठेवतो. आणि आता नुकतीच एक बातमी समोर येत आहे ती त्यांच्या मुलीबाबतची. त्यांची मुलगी आता बाॅलिवूडमधे पदार्पण करण्यास सज्ज होत आहे.
“अलहम खान” जी अमजद खान यांची मुलगी आहे ती आता पदार्पणासाठी सज्ज झाली आहे, तिचा विवाह 2011 साली जाफरी कराचीवाला यांच्यासोबत झाला आहे. अलहम यांनी आजवर सिने चित्रपटसृष्टीत काहीच काम केलेलं नाहीये. परंतु स्वत:च स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता ती लवकरच एका भुमिकेतून पडद्यावर उतरणार आहे.
अलहम खान आता देशपांडे लिखित नाटक “मिस ब्युटीफुल” या विषयावर बनणाऱ्या चित्रपटात काम करणार आहे. शक्यतो बऱ्याच सिनेरसिकांना अलहम खान यांच्याबद्दल फारच क्वचित माहिती आहे. तर यानंतर अनेकांना समजलं असेलच प्रसिद्ध सिनेअभिनेते अमजद यांची ती मुलगी आहे. याअगोदर अनेक वर्षे अलहम यांनी बाॅलिवूडपासून दूर राहणचं पसंत केल होतं.
शादाब व सीमाब हे दोघे अलहम यांचे भाऊ आहेत. या दोन्ही अभिनेत्यांनी बाॅलिवूडमधे प्रयत्न केले, परंतु दोघांनाही फार यश यातून मिळवता नाही आलं, आणि दोघांची ओळख मर्यादितच राहिली.
अलहम यांच्या सुंदरतेच्या चर्चा आजवर इंडस्ट्रीत व इतर माध्यामातून रंगल्या गेल्या होत्या परंतु याआधी कुठलीच स्पेशल अशी काही बाब त्यांच्याबद्दल समोर आली नव्हती. आणि आता सिनेमाच निमित्त झालं व अलहम पुन्हा प्रसिद्धीचा विषय झाली आहे.