फोटोत दिसणारी बालकलाकार होती बॉलिवूड मधील आघाडीची अभिनेत्री, पहा दिसतेय इतकी सुंदर आणि ग्लॅमरस…

फोटोत दिसणारी बालकलाकार होती बॉलिवूड मधील आघाडीची अभिनेत्री, पहा दिसतेय इतकी सुंदर आणि ग्लॅमरस…

बॉलिवूडची रंगीला गर्ल अर्थात उर्मिला मातोंडकर आज तिचा ४६ वा वाढदिवस साजरा करत आहे. ४ फेब्रुवारी १९७४ ला मुंबईत उर्मिलाचा जन्म झाला. गेल्या अनेक वर्षांपासून ती सिनेसृष्टीपासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती नेहमीच सक्रीय असते. स्वतःचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. २०१४ मध्ये ‘आजोबा’ सिनेमात तिने अखेरचं काम केलं होतं.

उर्मिला मातोंडकर यांनी 1980 मध्ये मराठी ‘झाकोल’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. कलयुग हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता. यानंतरही उर्मिला मातोंडकरने बालकलाकार म्हणून अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.

र्मिलाने फक्त हिंदीच नाही तर अनेक मराठी तेलगू, तमिळ आणि मल्याळम सिनेमांमध्येही काम केलं आहे. चमत्कार, जुदाई, सत्या, चायना गेट, खूबसूरत, लज्जा, पिंजर अशा हिट सिनेमांसाठी आज उर्मिलाला ओळखलं जातं. तसेच आजही उर्मिला तितकीच सुंदर आणि मनमोहक दिसते आहे. ती आपले अनेक फोटो इंस्टाग्रामवरून शेअर करत असते. ज्यामध्ये तिचे अनेक फोटो मनाला घायाळ करणारे असतात.

१० वर्ष लहान मुलाशी केलं लग्न :- उर्मिला मातोंडकरने तिच्याहून १० वर्ष लहान असणाऱ्या काश्मिरी मॉडेल आणि व्यावसायिक मोहसिन अख्तरशी लग्न केलं. उर्मिलाने २०१६ मध्ये कोणालाही पूर्व कल्पना न देता लग्न केलं. दोघांची भेट मनीष मल्होत्रामुळे झाली. मोहसिन हा कपड्यांचा व्यावसायिक आहे. एवढंच नाही तर झोया अख्तरच्या लक बाय चान्स सिनेमात त्याने अभिनयही केला आहे.

मोहसीन आणि मनीष मल्होत्रा यांचे ​​आपापसांत चांगले बॉन्डिंग आहे. 2007 च्या मिस्टर इंडिया स्पर्धेमध्ये मोहसिन दुसरा उपविजेता ठरला आहे. इतकेचं नाही तर मोहसिनने मनीष मल्होत्राच्या बर्‍याच शोमध्ये मॉडेलिंग केली आहे. एकेकाळी उर्मिलाचे नाव दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्याशीही जोडले गेले होते. तथापि, याबद्दल अद्याप कोणतेही अधिकृत विधान करण्यात आलं नाही.

दरम्यान राजकारणातून आपली सेकंड इनिंग सुरु करणाऱ्या उर्मिलाने अकाली राजकीय एक्झिट घेतल्याची चर्चा होती. मात्र तिने शिवसेनेत प्रवेश केल्यास ही ‘मराठी मुलगी’ मराठी माणसाच्या अस्मितेसाठी काम करेल, अशी अपेक्षा चाहते व्यक्त करत आहेत.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *