फोटो दिसणारी ‘ही’ क्युट मुलगी आहे मराठीतील आघाडीची अभिनेत्री ; तुम्ही हिला ओळखलंत का?

फोटो दिसणारी ‘ही’ क्युट मुलगी आहे मराठीतील आघाडीची अभिनेत्री ; तुम्ही हिला ओळखलंत का?

आपल्यातील अनेक जणांना सेलिब्रिटींचं वैयक्तिक आयुष्य जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. आता आपल्यामधीलच काही लोक टीव्हीवर हँडसम दिसणारा अभिनेता आणि ब्युटीफूल दिसणारी अभिनेत्री लहानपणी कसे बरे दिसत असतील, असा विचार करून कित्येक जण त्यांचे लहानपणीचे फोटो शोधतात. काही सेलिब्रिटी स्वतःच आपले असे काही फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर करतात.

तसेच आपल्याला माहित असेल कि सोशल मिडीयावर गेल्या काही महिन्यांपासून थ्रोबॅक फोटो आणि जुन्या आठवणी पोस्ट करण्याचा ट्रेंड पाहायला मिळतोय. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार यानिमित्ताने त्यांचे लहानपणीचे फोटोही पोस्ट करताना दिसत आहेत. आता अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हा’यरल होतो आहे.

‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘हॅपी जर्नी’, ‘टाइमपास २’, ‘वजनदार’ यांसारखे एकापेक्षा एक हिट चित्रपट देणाऱ्या अभिनेत्री प्रिया बापटने बालपणातील एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. आपण पाहत असाल कि या फोटोत प्रियासह तिचे बाबा आहेत, बाबा आणि मी असं तिनं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. ही छोटी प्रियाही तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. असा हा सुंदर फोटो पाहून लोकांकडून बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत.

तसेच सध्या अभिनेत्री प्रिया बापट हिच्या एका कलाकृतीबद्दल अशीच उत्सुकता असणार आहे. प्रिया एका इंटरनॅशनल प्रोजेक्टमध्ये काम करतेय. आदित्य कृपलानीच्या या कलाकृतीचं नाव ‘फादर लाइक’ असं आहे. पुढच्या महिन्यात सिंगापूर इथं याचं चित्रीकरण सुरू होणार आहे.

तसेच आपणास माहित असेल कि मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट हे एक क्युट कपल म्हणून ओळखले जातात. सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ते लग्नबेडीत अ’डकले होते. तसेच उमेश कामत हे एकाच इंडस्ट्रीत असल्याने एकमेकांना खूप अगोदरपासून चांगले मित्र होते.

कालांतराने दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले पण एकमेकांसाठी असलेले प्रेम व्यक्त कोण करणार अशी अडचण होती. अखेर प्रियाने पुढाकार घेत प्रेम व्यक्त केले आणि उमेशने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या प्रेमाला होकार दिला. उमेश आणि प्रिया यांच्या वयात 8 वर्षाचे अंतर आहे.

या कारणामुळे उमेश लग्नाबाबत साशंक होता. यासाठी त्याने सहा वर्षाचा वेळ घेतला आणि अखेर लग्न करण्याचा निर्णय घेतला. काकस्पर्श, टाईमपास-२, टाईम प्लीज, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, वजनदार या मराठी चित्रपटांबरोबरच ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *