‘बचपन का प्यार’ फेम सहदेवचे बदलले नशीब ‘या’ मोठ्या सिंगर आणि रॅपरने दिले भेटीचे निमंत्रण…

‘बचपन का प्यार’ फेम सहदेवचे बदलले नशीब ‘या’ मोठ्या सिंगर आणि रॅपरने दिले भेटीचे निमंत्रण…

इंटरनेट म्हणजेच सोशल मीडियामुळे अनेकांना अगदी सहज आणि सोपा असा प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे. अनेकांनी त्याचा योग्य वापर करुन, नाव कमवले आहे. तर काही अजूनही त्यासाठी धडपड करत आहेत. या इंटरनेट म्हणजेच सोशल मीडियावर रोज कित्येक व्हिडियो अपलोड होतच असतात. अपलोड झालेल्या या व्हिडियोंपैकी काही व्हिडियो तुफ़ा वायरल होतात.

असे व्हिडियो जे वायरल होण्याची कोणीच अपेक्षा नव्हती केली, तेदेखील चांगलेच वायरल होतात. कधी काय वायरल होईल याचा मात्र काही नेम नाही. एका छोट्याश्या गोष्टीतून मोठा बदल घडवण्याची ताकद या सोशल मीडियाकडे आहे. कधी एका अंड्यावर करोडो लाईक्स येतात, तर एखादा चहावाला फिल्मस्टार सारखाच हँडसम आहे म्हणून प्रसिद्धी मिळवतो.

मध्ये हेवी ड्रॉयव्हर ट्रेंड चांगलंच वायरल झाला होता. पार्टी हो राही है या ट्रेण्डने तर सगळे रेकॉर्ड्सच मोडले होते. बिग बॉस फेम शेहनाजच्या ‘टॉमी कुत्ता’ ट्रेंड देखील चांगलंच प्रसिद्ध झाला होता. तर, साथिया मालिकेचा ‘कुकरमेसे चणे निकाल दिये’ हा ट्रेंड इतका लोकप्रिय आणि प्रसिद्ध झाला होता की, ही लोकप्रियता बघून मेकर्सने चक्क मालिकेचा दुसरा सिझन बनवला आहे.

असे अनेक ट्रेंड्स सोशलमिडियावर सुरूच असतात. सध्या तुम्ही कोणताही सोशल मीडियाचे अकाऊंटन उघडले तर, ‘बचपन का प्यार’ हेच सगळीकडे ऐकायला मिळेल. शाळेचा गणवेश घातलेला एक मुलगा ‘जाने मेरी जानेमन बचपन का प्यार’ हे गाणं अगदी तल्लीन होऊन गाताना दिसतोय, जणू काय इवल्याशा मुलाला खरोखरचं प्रेम झालय.

तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण, हा व्हिडीओ जवळपास दोन वर्ष जुना आहे. मात्र अचानकच हा व्हिडियो पुन्हा एकदा सोशल मीडियावर ज’बरदस्त वा’यरल होतोय. सगळेच या व्हिडियोचा ट्रेंड फॉलो करत असलेले बघायला मिळत आहेत. यात आता सगळ्यात विशेष म्हणजे, हा व्हिडीओ बघून बॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर बादशाह याने या व्हिडियोतील छोट्या मुलाला भेटीचं आमंत्रण दिलं आहे.

वायरल होत असणारा हा ओरिजनल व्हिडीयो जवळपास दोन वर्षांपूर्वी युट्यूबवर अपलोड केला होता. यामध्ये, एक शाळकरी मुलगा त्याच्या शिक्षकांसमोरच ‘बचपन का प्यार मेरा भूल नही जाना रे’ हे गाणं गाताना दिसत आहे. या मुलाचं नाव सहदेव आहे आणि तो छत्तीसगड राज्यातील सुकमा येथील छिंदगडमध्ये राहत आहे.

आता अचानकच पुन्हा एकदा हा व्हिडीयो सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला. या व्हिडियोची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. आणि आता तर रॅपर बादशाहनेसुद्धा स्वतः त्याच्या अकाउंटवरून हा व्हिडीयो शेअर केला आहे. त्याने केवळ हा व्हिडियो शेअरच नाही केला तर, सहदेवसोबत संपर्कसुद्धा साधला आहे.

बादशाहने या मुलासोबत व्हिडीयो कॉलवर चांगल्या गप्पा मारल्या आणि त्याला चंदीगढला भेटायला येण्याचं निमंत्रण डॆहील देऊन टाकलं. या व्हिडीयोकॉल नंतर आता बादशाह आणि छोटा सहदेव लवकरच एखाद्या गाण्यात एकत्र दिसणार आहेत अशी शक्यता सगळीकडून वर्तवली जात आहे. दोघांच्या एकत्र येणाऱ्या गाण्यासाठी चाहत्यांमध्ये मात्र प्रचंड उत्सुकता बघायला मिळत आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *