बापरे! तान्हाजीच्या यशानंतर ‘राजामौली’ यांच्या चित्रपटासाठी ‘अजय देवगण’ने घेतले इतकं मानधन…

बापरे! तान्हाजीच्या यशानंतर ‘राजामौली’ यांच्या चित्रपटासाठी ‘अजय देवगण’ने घेतले इतकं मानधन…

‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाला प्रदर्शित होऊन जवळपास एक महिना झाला आहे. या ऐतिहासिक चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश वेड लावले आहे, म्हणूनच चौथा आठवड्यातही अनेक नवीन चित्रपटांचे आव्हान असताना तानाजी चित्रपटाची घोडदौड अजूनही सुरूच आहे. बॉक्स ऑफिस वर बक्कळ कमाई करत तानाजी चित्रपटाने नवनवीन मोठे विक्रम केले आहे. आणि कमाईच्या बाबतीत ‘तान्हाजी चित्रपटाने’ बहूबली 2 या ब्लॉकबस्टर चित्रपटाला देखील मागे टाकले आहे.

तानाजी चित्रपट सुपरहिट झाल्यामुळे अजय देवगनचा भाव वाढला आहे. आता अजय देवगन बाहुबली चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली त्यांच्या चित्रपटात काम करणार आहे आणि या चित्रपटात काम करण्यासाठी अजय देवगनने किती पैसे घेतले हे ऐकून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. अजय देवगन त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी कोरड्या रुपये मानधन घेत असतो पण तानाजीच्या यशानंतरही अजयने यस यस राजामौली यांच्या चित्रपटात काम करण्यासाठी एक रुपयाही मानधन घेतलेले नाही


एसएस राजामौली आणि अजय देवगण यांची खूप चांगली मैत्री आहे आणि या मैत्रीखातर अजय देवगनने न एक रुपयाही न घेता या चित्रपटात काम करण्याचे ठरविले आहे

अजय देवगनचा ‘तान्हाजी – द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात अजय देवगनने तानाजी मालुसरे यांची अप्रतिम भूमिका साकारली आणि त्या भूमिकेला चित्रपटात त्याने खरोखर न्याय मिळवून दिला. या चित्रपटात फक्त अजय देवगन नव्हे तर संपूर्ण तानाजी मधील कलाकारांनी खूप परिश्रम घेऊन मराठ्यांची गाथा पडद्यावर साकारली.

‘तान्हाजी – द अनसंग वॉरियर’ चित्रपटातील छोट्या भूमिकेपासून ते मोठ्या भूमिकेपर्यंत सर्वच भूमिका प्रेक्षकांना फार आवडल्या. त्यात अजय देवगन, देवदत्त नागे, शरद केळकर, सैफ अली खान, आणि काजल या महत्त्वाच्या भूमिका होत्या. आणि प्रेक्षकांनी देखील त्यांच्या अभिनयाचे तोंड भरून कौतुकही केले.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *