बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात पोहोचला गजराज, भक्तीची पराकाष्ठा बघून उपस्थित लोकही झाले चकित…

सध्या सगळीकडेच वातावरण गणपती बाप्पाच्या भक्तीने अतिशय भक्तीमय असे झालेले आहे. केवळ केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मात्र मुंबई पुणे या ठिकाणी गणेश उत्सवाची शोभा काही वेगळीच असते. दहा दिवस गणपती बाप्पा आपल्या घरी येतात आणि सर्वजण अगदी मनोभावे त्यांची सेवा करतात.
हे दहा दिवस सगळीकडेच वातावरण अगदी भक्तिमय असे झालेले आपल्याला बघायला मिळते. बाप्पाच्या भक्तीमध्ये सर्वजण लिन होऊन जातात. यामध्ये केवळ माणसेच नाही तर अनेक वेळा प्राणीदेखील गणपती बाप्पाची भक्ती करताना आपल्याला बघायला मिळतात.
मात्र तेवढेच प्रेमळ नाते गजराज आणि गणेशाचे आहे, हे आपल्या अनेक पौराणिक कथामधून समोर आलेले आहे. याच परिचय या व्हिडिओमध्ये आलेला बघायला मिळत आहे. एका गणेश मंदिरात अनेक भक्त जमा झालेले बघायला मिळत आहेत. सोबतच या मंदिरात एक हत्ती देखील उभा आहे.
मंदिरामध्ये सर्वजण गणेशाची पूजा करत आहेत त्या सर्वांना सोबतच हत्ती देखील अगदी मनोभावे गणपतीची पूजा करत असलेला बघायला मिळत आहे. या भक्तीच्या वातावरणात भक्तीमय होऊन अगदी प्रेमाने आणि सन्मानाने तो गजराज गणेशाच्या पुढे नतमस्तक झालेल्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहे. हा संपूर्ण देखावा बघून अनेकांचे डोळे दिपून गेले.
यावरूनच प्राणीदेखील भक्ती भाव समजतात हे समोर येते. त्यामुळे या व्हिडिओ वरती लाईक्सचा अक्षरशः वर्षाव होत आहे. या व्हिडिओला अवघ्या काही तासातच हजारोंनी लाइक्स आले आहेत. लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे आणि अनेकांनी तो शेअर देखील केला आहे.
आपल्या समृद्ध अशा भारतीय संस्कृतीचा परिचय या व्हिडीओ मधुन बघायला मिळत आहे, असे काही ने कमेंट केले आहे. तर काही नेटकरी म्हणतात गजराजाचे गणेशा साठी असलेले प्रेम बघा. या व्हिडिओवर अनेकांनी वेगवेगळे कमेंट केले आहेत. मात्र हा व्हिडीओ बघून जवळपास सर्वच अगदी भक्ती रसात बु’डून गेले आहेत.
Whether human or animal, true bhakti is all that's needed to be close to Bhagwan. pic.twitter.com/O1s1uHnSoS
— Vertigo_Warrior (@VertigoWarrior) September 11, 2021