बिग बी अमिताभ बच्चन यांच्या नावाने रजिस्टर्ड कार रस्त्यावरुन जप्त; चालवत होता सलमान खान, वाचा काय आहे प्रकरण..

बिग बी अमिताभ बच्चन यांच्या नावाने रजिस्टर्ड कार रस्त्यावरुन जप्त; चालवत होता सलमान खान, वाचा काय आहे प्रकरण..

बॉलीवूड म्हणजे खरोखरच मायानगरी आहे. इथे कधीही काहीही होऊ शकत. याचे अनेक उदाहरण आपण अनेक वेळा पहिले आहेत. कधी मैत्रीपूर्ण नाते असणारे सेलिब्रटीज एकेमकांचा चेहरा सुद्धा बघत नाही, तर कधी वर्षानुवर्षे असणारी कटुता क्षणात दूर झालेली बघायला मिळते. अनेकवेळा यापेक्षाही भन्नाट प्रकार आपल्याला बॉलीवूडमध्ये बघायला मिळतात.

त्यामुळे सतत मनोरंजन तर होतच राहते. कधी काही अभिनेत्रींचा मेकअप आर्टिस्ट वरुन वा’द होतो, तर कधी ड्रेस डिझायनर वरुन. कधी ऍक्शन सिन सारखे म्हणून अभिनेत्यांमध्ये वा’द जुंपतो, तर कधी सारखे कपडे घातले म्हणून अभिनेत्रीचा वा’द सुरु असतो. रोजच असे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात. मात्र कधी कधी अनपेक्षित प्रकार देखील बघायला मिळतात.

मात्र दुसरीकडे अमिताभ-अभिषेक यांचे सलमान सोबत ठीक-ठाक नाते आहे. अत्यंत घनिष्ट मैत्री नाही, पण साधारण नातं तर बच्चन आणि खान कुटुंबामध्ये आहे. आता मात्र, एका वेगळ्याच बातमीने सगळीकडेएकच गोंधळ उडवला आहे. एक रोल्स रॉयल्स कार पो’लिसां’नी जप्त केली. ती कार सलमान खान असे नाव असलेला ड्राइव्हर चालवत होता, तर त्या कारच्या मालकाचं नाव अमिताभ बच्चन आहे.

कर्नाटक परिवाहन मंडळाने, बॉलीवूडचे बिग बी म्हणेजच अमिताभ बच्चन यांच्या नावावर रजिस्टर असणारी कार जप्त केली. मात्र चौ’कशी केल्यानंतर समोर आलं की, ती कार अमिताभ बच्चन यांनी वि’कली आहे आणि अद्याप त्या कारचं रजिस्ट्रेशन नव्या मालकाच्या नावे झालं नाही. त्यामुळे हा सर्व गोंधळ उडाला. उमराह डेल्व्हलपर्स मालिक बाबू यांनी अमिताभ यांच्याकडून सहा कोटी रुपयांना रोल्स रॉयल्स कार खरेदी केली होती.

जुनं वाहन खरेदी केल्यानंतर, नाव बदलण्यासाठी त्यांनी अर्ज देखील केला होता. पण काही कारणास्तव ते काम माघे पडले, आणि त्यातून इतका मोठा गोंधळ उडाला. या प्रकरणी बोलताना बाबू म्हणाले की, ‘माझ्याकडे दोन रोल्स रॉयल्स कार आहे. जेव्हा कार जप्त केली तेव्हा, माझी मुलगी त्या कारमधून प्रवास करत होती.

अधिकाऱ्यांनी तिला शहराच्या बाहेरील नेलामंगळा येथे असलेल्या आरटीओ कार्यालयात येण्यास सांगितले आहे. तिने त्यांना घरी सोडण्याची विनंती केली होती. त्यांनी तिला घरी सोडण्याची सोय केली. परिवहन विभागाचे अतिरिक्त आयुक्त नरेंद्र होळकर या प्रकरणात माहिती देताना म्हणाले की, ‘योग्य कागदपत्रांअभावी लक्जरी रोल्स रॉयस कार जप्त करण्यात आली आहे.

मालकाने अमिताभ बच्चन यांची स्वाक्षरी असलेले पत्र सादर केले आहे, त्यामध्ये असे म्हटले आहे की हे वाहन त्याला विकले जात आहे.मात्र अजूनही मालकाने कागदोपत्री आपल्या नावावर हे वाहन केलेले नाहीये. त्यामुळे कारवाई करण्यात आली असून सर्व, फॉर्मॅलिटी पूर्ण झाल्यावरच कार सोडण्यात येईल.’

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.