बिग बॉस मराठी : शाकाहारी असूनही ‘या’ स्पर्धाकाच्या डोक्यावर तृप्ती देसाईने फोडली अंडी..

बिग बॉस मराठी : शाकाहारी असूनही ‘या’ स्पर्धाकाच्या डोक्यावर तृप्ती देसाईने फोडली अंडी..

सध्या सोशल मीडियावरती मनोरंजन विश्वातील बिग बॉसची चर्चा बघायला मिळत आहे. बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व पहिल्याच आठवड्यापासून चर्चेचा विषय बनला आहे. अनेक दिग्गज कलाकार यंदाच्या बिग बॉस मध्ये देखील सदस्य म्हणून सामील झाले आहेत. सुरेखा कुडची, स्नेहा वाघ यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे.

त्यामुळे त्यांच्याकडून चाहत्यांच्या अपेक्षा देखील मोठ्या आहेत. मात्र, अद्यापही या दोघींना आपली वेगळी ओळख बिग बॉसच्या घरात निर्माण करण्यात यश मिळाले नाही. तर दुसरीकडे समाजसेविका तृप्ती देसाई काहीही करून, प्रकाशझोतात येण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र त्यांच्या गेमवर सोशल मीडियावरती कडाडून टीका होत आहे.

लाइमलाइटमध्ये येण्यासाठी ही बाई काही करू शकते, असे म्हणत नेटकर्यांनी त्यांना ट्रोल केले होते. सध्या बिग बॉसच्या घरात साप्ताहिक कार्य सुरू आहे. या कार्यामध्ये दोन सदस्य बिग बॉसने दिलेल्या गाडीवरती बसून असणार आहेत, आणि त्यांना उठवण्यासाठी वि’रोधी गटातील सदस्य प्रयत्न करणार. त्यासाठी शाब्दिक वार आणि इतर काही गोष्टींचा उपयोग वि’रोधी गटातील सदस्य करू शकतात.

त्यामुळे प्रथम जेव्हा सोनाली आणि सुरेखा कुडची दोघी गाडीवर बसल्या होत्या त्यावेळी, त्यांना उठवण्यासाठी तृप्ती देसाईने चक्क कचरा त्या दोघींवर फेकला होता. मात्र संचालक उत्कर्ष, तृप्ती देसाईच्या गटाकडून असल्यामुळे त्याने त्यावर कोणत्याही प्रकारचा आ’क्षेप घेतला नाही. यावर देखील नेटकऱ्यांनी चांगलीच टी’का केली आहे.

त्यातच कालच्या भागात बघायला मिळाले की, तृप्ती देसाई यांनी विशालला उठवण्यासाठी भलतच काहीतरी केले. विशाल निकम याची बॉडी बघता, सर्वांना तो मां’साहारी वाटत असेल. मात्र त्याची विठ्ठलावर निस्सीम भक्ती असल्यामुळे, तो शुद्ध शा’काहारी आहे. प्रीमियरच्या वेळेस त्याने, महेश मांजरेकरला आपली विठ्ठलाची भक्ती आणि शा’काहारी असल्याबद्दल सांगितले होते.

आता विशाल- विकास सोबत गाडीवर बसलेला बघायला मिळत आहे. गायत्री दातार आणि जय दुधाने या दोघांनी सतत जोराने पाण्याचा मारा करून देखील, ते दोघे आपल्या जागेवरून हलले नाही. शिवाय, मीरा जगन्नाथने थेट विशालच्या डो’ळ्यात पावडर टाकली तरीही, तो आपल्या जागेवरून उठला नाही. मात्र संचालक उत्कर्ष यावर देखील, काहीही बोलला नाही.

अतोनात प्रयत्न करून देखील विशाल आणि विकास उठत नाही. हे बघून तृप्ती देसाई यांनी अंडी आणले, ‘तू शा’काहारी आहेस म्हणून तुझ्यावर मी हे अंडे टाकू इच्छित नाही. पण तू इथून उठ,’ असं म्हणत तृप्तीने विशालला ब्लॅ’कमेल केले. मात्र विशाल तरीही नाही उठला, हे बघून चि’डून तृप्ती देसाई आणि दादुस या दोघांनी चक्क विशाल वर अंडे फे’कले.

त्या अंड्याचा जोरदार मा’रा विशालवर झाला. अंडी फे’कल्यामुळे सहाजिकच विशालला ती जोरात लागली. तरीही संचालक उत्कर्ष बौस्ड होऊन केवळ बघत होता. आता यावर महेश मांजरेकर उत्कर्षची क्लास घेणार का, असा प्रश्न सोशल मीडियावर रंगत आहे. सोबतच तृप्ती देसाईच्या या कृत्यावर जोरदार टी’का होत आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *