‘बेल बॉटम’ च्या ट्रेलरमध्ये इंदिरा गांधींची भूमिका साकारणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखून दाखवा ? आहे ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री

‘बेल बॉटम’ च्या ट्रेलरमध्ये इंदिरा गांधींची भूमिका साकारणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखून दाखवा ? आहे ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री

बॉलीवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार देशभक्तीपर सिनेमा बनवतच असतो. त्याचा प्रत्येक सिनेमा तेवढाच हिट देखील ठरतो. त्याचा चित्रपटाबद्दल जाहीर होताच, सगळीकडेच त्याची चर्चा सुरु होते. त्याचे अनेक सिनेमाचे चित्रीकरण लवकरच सुरु होणार आहे. त्यामध्ये, पृथ्वीराज चव्हाण हा सिनेमा मात्र सध्या चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

मात्र त्याचा बेल बॉटम हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे ट्रेलर त्याने कालच रिलीज केले. सुरुवातीपासूनच या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली होती. आणि या सिनेमाचे ट्रेलर देखील तेवढेच दमदार आहे.

को’रो’नाच्या पार्श्वभूमीवर, थिएटर मध्ये हा सिनेमा रिलीज होणार कि नाही याबद्दल चर्चा सुरु होत्या, आणि काळ अक्षयने या सिनेमाची रिलीज होण्याची नवी तारीख सांगितली आहे. या ट्रेलरमध्ये खास आकर्षण ठरत आहे ते, स्व मा श्रीमती इंदिरा गांधी यांचे पात्र. आजवर आपल्या देशाच्या सर्वोत्तम पंतप्रधान म्हणून श्रीमती इंदिरा गांधी संपूर्ण जगात ओळखल्या जातात.

त्यामुळे कोणत्याही सिनेमामध्ये जेव्हा त्यांचे पात्र असते, तेव्हा ती भूमिका कोण साकारणार याबद्दल कायमच उत्सुकता असते. तशीच उत्सुकता या सिनेमाबद्दल देखील आहे. ट्रेलरमध्ये श्रीमती इंदिरा गांधींची भूमिका रेखाटणाऱ्या अभिनेत्रींच्या लूकची चांगलीच चर्चा होत आहे. मात्र ही अभिनेत्री कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी सर्व उत्सुक आहेत.

तर ही अभिनेत्री आहे मिस युनिव्हर्स लारा दता. श्रीमती इंदिरा गांधींच्या लूकमध्ये लारा दत्ताला ओळखणे अशक्यच आहे. तिचा मेकअप आणि तिच्या लूकवर भरपूर काम करण्यात आलं आहे. ‘जगातील सर्वात पावरफुल महिलेची भूमिका साकारताना मला खूप मेहनत घ्यावी लागली. श्रीमती इंदिरा गांधींची भूमिका म्हणजे कोणत्याही चुकेल जागा नाही.

त्यासाठी मी त्यांचे अनेक भाषण आणि मुलाखती बघितल्या आहेत. त्यांचे हावभाव आणि त्यांचे भारदस्त व्यक्तीमत्व पडद्यावर घेऊन जाताना मला कोठीही कमी पडायचं नव्हतं. त्याच्या भूमिकेचा अभ्यास करत असताना, मला त्यांच्याबद्दल खूप काही जाणून घेता आले. त्यांच्याबद्दल एवढे सर्व जाणून घेतल्यानंतर त्यांच्याबद्दलचा आदर आणि प्रेम अजूनच जास्त वाढला आहे.

मी माझ्या कडून सर्व प्रयत्न केले आहेत. आशा करते की, सर्वाना माझे काम आवडेल’ असं लारा एका मुलाखतीमध्ये बोलली आहे. ८० च्या काळातील हा सिनेमा, भारतीय गुप्तहेरांवर आधारित आहे. एक भरती गुप्तहेर जर्मनीमध्ये जातो आणि मग काही महत्वाची बातमी हाती लागते.

आपल्या देशातील महत्वाच्या व्यक्तींपर्यंत ही माहिती पोहचवण्यासाठी आणि देशाच्या सुरक्षिततेसाठी तो गुप्तहेर कसे काम करतो या सत्यघटनेवर आधारित हे कथानक आहे. त्यामुळे या सिनेमाबद्दल चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. लारा दत्ता सोबतच हुमा कुरेशी आणि वाणी कपूर देखील या सिनेमामध्ये महत्वाचे पात्र रेखाटत आहेत.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *