बॉलिवूडमध्ये आलेल्या ‘या’ भ’यंकर अनुभवामुळे अनुराधा पौडवाल यांनी बॉलीवुड सोडून भजन गायला केली सुरुवात ! महेश भट्टमुळे…

बॉलिवूडमध्ये आलेल्या ‘या’ भ’यंकर अनुभवामुळे अनुराधा पौडवाल यांनी बॉलीवुड सोडून भजन गायला केली सुरुवात ! महेश भट्टमुळे…

मायानगरी म्हणून देखील बॉलीवुडची ओळख आहे. बॉलीवूड बद्दल असे सांगितले जाते की, प्रत्येक शुक्रवारी नवीन सिनेमा रिलीज होतो आणि त्यामुळे प्रत्येक शुक्रवारी येथील कलाकारांचे नशीब पालटते. सुपरहिट ठरलेला कलाकार एखाद्या फ्लॉप सिनेमामुळे मागे पडतो तर, फ्लॉप ठरलेला कलाकार एखाद्या उत्तम अशा सिनेमामुळे पुढे जातो.

हे सत्र सुरूच असते मात्र बॉलिवूडला मोठाल्या आणि दिग्गज कलाकारांना देखील विसरून जाण्याची एक जुनी सवय आहे. तुम्ही बॉलीवूड मध्ये सक्रिय नसाल तर काही काळाने बॉलिवूडच काय तर, इतर सर्वजण देखील तुम्हाला विसरुन जातील. आणि हे सत्य अनेक वेळा आपल्याला बघायला मिळाले आहे.

अलका या एका महाराष्ट्रीयन कुटुंबातील असून लग्नानंतर त्यांचे नाव अनुराधा असे बदलण्यात आले. आजही महाराष्ट्रातील काही भागात लग्नानंतर मुलीचे नाव बदलण्याची परंपरा आहे, त्यामुळेच त्यांचे नाव अलका पासून अनुराधा झाले. कॉमेडी नाइट्स विथ कपिल शर्मा या शोमध्ये, म्युझिक स्पेशल एपिसोड होता. तिथेच अनुराधा पौडवाल, उदित नारायण आणि कुमार सानू पाहुणे म्हणून आले होते.

त्यावेळी अनुराधा पौडवाल यांनी अनेक वेगवेगळे खुलासे केले. मात्र, सर्वात मोठा खुलासा तेव्हा झाला,जेव्हा त्यांनी बॉलिवूड सोडून भजन गायला का सुरुवात केली याचे कारण सांगितले. याबद्दल बोलताना अनुराधा सांगतात की, ‘बॉलीवूड मध्ये डायरेक्‍टर आणि प्रोड्यूसर नाही तर, हिट अभिनेता आणि अभिनेत्री यांच्या मर्जीवर कोणाला गाणे मिळणार किंवा नाही हे ठरवले जात होते.

त्यामुळे हे सगळं काही मला थोडंसं असुरक्षित असे वाटत होते. भक्तिगीते मला आधीपासूनच आकर्षित करत होते. सुरुवातीपासूनच भक्तिगीते गाण्याकडे माझा कल होता. त्यामुळे बॉलिवूड सोडून भक्ती गीते गाण्यास मी सुरुवात केली. त्यामुळेच आशिकी सिनेमा उत्तम अशी हिट गाणे दिल्यानंतर माझं करिअर आणि लोकप्रियता अगदी पीक वर होती.

पण बॉलीवूड मध्ये असणाऱ्या असुरक्षितिततेमुळे, मी सर्व काही सोडून भक्तिगीते गाण्याची सुरुवात केली. काहींना कदाचित माझा हा निर्णय चुकीचा ही वाटत असेल. पण मी माझ्या आयुष्यामध्ये समाधानी आहे. काम करण्याची प्रत्येकाची अशी वेगळी पद्धत असते. त्यामुळे कोण चूक किंवा कोण बरोबर हे आपण ठरवू शकत नाही.’

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.